नाशिक शातांराम दुनबळे
नाशिक- येवला तालुक्यातील पाटोदा येथील ग्रुप ग्रामपंचायत मोठी ग्रामपंचायत असून या ग्रामपंचायत मध्ये १७ सदस्य सख्यांअसून या ग्रामपंचायतला १४ ते १५वा वित्त आयोगाचा भरपूर निधी येतो परंतु ग्रामपंचायती वतीने नदी नाले साफसफाई करत नाही कारण नदीमध्ये घाण कचरा झाडे झुडपे वाढलेली आहे तसेच मशीद ते दत्त मंदिर पर्यंत रस्त्यांकडे घनकचरा असून गावातील दवाखाना जवळील गटार तुंबून भरलेली आहे गावात स्वच्छता नाही यामुळे घाण कचरा गटारी मुळे वास येतो व मोठ्या प्रमाणावर डासांचा सुळसुळाट झालेला आहे.
व गावातील डोर वस्ती येथे ग्रामपंचायतीने निष्कृष्ट दर्जाचे अंडरग्राउंड गटार व काँक्रिटीकरण केले याची पण चौकशी त्वरित व्हावी यामुळे गावात आजरांचे प्रमाण वाढत आहे तरी याकडे ग्रामसेवक सरपंच लक्ष देत नाही तरी पाटोदा गावची स्वच्छतेची त्वरित चौकशी करावी व यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी ग्रामपंचायत सदस्य उस्मान भाई शेख यांनी केली आहे
Tags
news
