राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाची केंद्रीय/राज्य कार्यकारिणी बैठक दि.24 नोव्हेंबर 2022 रोजी शिर्डीत होणार, अण्णासाहेब कटारे यांची घोषणा',, नाशिक शातांराम दुनबळे



नाशिक -राष्ट्रीय रिपब्लिकन पक्ष नाशिक शहर जिल्हा कार्यकर्ता बैठक राष्ट्रीय अध्यक्ष अण्णासाहेब कटारे यांच्या प्रमुख उपस्थितीत शासकीय विश्रामगृह नाशिक येथे संपन्न झाली
  संपूर्ण भारत भर राष्ट्रीय रिपब्लिकन पक्ष जोमाने वाटचाल करीत आहे.महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातुन प्रत्येक शहरात/जिल्ह्यात तालुक्यात राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षात विविध क्षेत्रातील कार्यकर्ते सामील होत आहे.पक्षाची ताकत अधिकच मजबूत होत असून दि.24 नोव्हेंबर 2022 रोजी शिर्डी येथील शासकीय विश्रामगृह येथे केंद्रीय/राज्य कार्यकारिणी ची बैठक राष्ट्रीय अध्यक्ष अण्णासाहेब कटारे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडणार असून त्या अनुषंगाने नाशिक शहर/जिल्हयाच्या वतीने
 महाराष्ट्र प्रदेश महासचिव अँड.विजयजी पवार यांनी बैठकीचे आयोजन केले होते.
 बैठकीस 
*राष्ट्रीय प्रवक्ते गिरीश जी अकोलकर,जिल्हा नेते दिलीप काका प्रधान,नाशिक जिल्हाध्यक्ष विधी विभाग अँड.युवराज देवरे,नाशिक युवा जिल्हाध्यक्ष जितू भाऊ बागुल,नाशिक शहर अध्यक्षा महिला आघाडी रेश्माताई बच्छाव,नाशिक तालुका संघटक जयराम ससाणे,युवा नेते पंचवटी हेमंत आहेर,प्रशांत कटारे,नितीन गांगुर्डे,सप्तश्रृंगी गड पदाधिकारी अमृत यशवंत पवार,आहिरे भाऊसाहेब नामदेव,सुनील गायकवाड सर,वसंत साळुंके, बाबूलाल पगारेसर,भाऊसाहेब आहिरे,आदी उपस्थित होते.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने