वाल्मीक ऋषी विद्यालयात संविधान दिन उत्साहात संपन्न विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना विद्यालयातील शास्त्रज्ञांच्या उपस्थितीने अभिवादन



ज्ञानोपासक शिक्षण मंडळी दोंडाईचा संचलित वाल्मीक ऋषी माध्यमिक विद्यालय तावखेडा प्र.न. येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन  व अभिवादन करून विद्यालयाच्या कर्तव्य शिस्तप्रिय मुख्याध्यापिका श्रीम. पी .पी. महिरे - वाघ व उप मुख्याध्यापक श्री. एस. एस. पाटील यांच्या मार्गदर्शनाने व नवोपक्रमशील शिक्षक श्री एन.पी.भिलाणे यांच्या सुयोग्य नियोजनाने आणि प्रेमराज पेंढारकर या विद्यार्थ्यांने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या भूमिकेत  संपूर्ण गावात सविधान रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.
         याप्रसंगी गावातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातील प्रतिमेस अभिवादन व  संविधान सादर करून गावाचे पोलीस पाटील व कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्येष्ठ शिक्षक श्री. सी. झेड. कुवर , विद्यालयातील विज्ञान कोडे विजेते  कु. हर्षदा गिरासे ,प्रशांत गिरासे हे अनुक्रमे , न्यूटन व थॉमस अल्वा एडिसन या शास्त्रज्ञांच्या भूमिकेतील विद्यार्थी व गावातील प्रतिष्ठित मान्यवर, ज्येष्ठ नागरिक व युवा बंधू- भगिनी यांच्या उपस्थितीने करण्यात आले.

संविधान रॅलीचे स्वागत जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष आबासाहेब ज्ञानेश्वर भामरे , माजी सरपंच मंगा कोळी व ग्रामपंचायतचे आजी माझी सदस्य  पदाधिकारी, कुलकर्णी बंधू -भगिनी त्याचप्रमाणे गावातील सुजान नागरिक बंधू -भगिनी यांनी उत्स्फूर्त स्वागत केले. याप्रसंगी विद्यालयाची प्रगती, तंबाखू मुक्ती ,व्यसनमुक्ती, महिला संरक्षण ,बालविवाह प्रतिबंध कायदा, मोफत शिक्षणाचा हक्क ,बेटी बचाव बेटी पढाओ , स्वच्छता अभियान, राष्ट्रीय एकात्मता, मुलींच्या जन्माचे स्वागत या विषयांवर विद्यालयातील उपक्रमाशील शिक्षक श्री. एन. पी. भिलाणे यांनी प्रबोधन केले. विद्यालयाच्या इंग्रजी विषयाच्या उपक्रमशील शिक्षिका श्रीमती मंगलाताई कुवर ,श्री. पी. एच. लांडगे व श्री नितीन पाटील यांची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती लाभली होती.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी कनिष्ठ लिपिक श्री जितेंद्र एन राजपूत ,श्री दिलीप आबा पाटील  व श्री चुडामन नाना धनगर यांनी मोलाचे सहकार्य केले

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने