शिरपूर प्रतिनिधी - शिरपूर तालुक्यातील आमोदे गावाने तालुक्यात एक धार्मिक तीर्थक्षेत्र म्हणून ओळख निर्माण केले असून आमोदे गावास मंदिराचे गाव म्हणून देखील ओळखले जात आहे. यापूर्वी गावात अति प्राचीन कालीन राजमाता अहिल्याबाई होळकर यांनी निर्माण केलेले सारंगेश्वर मंदिर (महा देव मंदिर) आहे. तसेच तालुक्यातील हजारो भाविकांचे श्रद्धास्थान लाकड्या हनुमान मंदिर देखील आमोदा परिसरात आहे. गावात दुर्मिळ असे माता वैष्णवी देवीचे मंदिर असून गाव दरवाजा ला लागून कुलस्वामिनी सप्तशृंगी मातेचे मंदिर उभारण्यात आले आहे. आमोदे गावात भव्य असे रामदेव बाबा मंदिर साकारण्यात आले असून या गावाच्या कॉलनी परिसरात भव्य असे गजानन महाराजांचे मंदिराचे काम देखील पूर्णत्वास आले आहे. आणि आता गावकऱ्यांनी राजपूत समाजाचे कुलदैवत व हजारो इतर समाज बांधवांचे श्रद्धास्थान श्री कुलस्वामिनी कैलामाता व कुलस्वामिनी बाण माता यांच्या मंदिर निर्माणच्या शुभारंभ केला आहे.
नुकताच आमोदे गावात शिव महापुराण कथा या भव्य असा कार्यक्रम संपन्न झाला असून आगामी काळात गावात लवकरच भव्यदिव्य असा हरिनाम सप्ताह चे आयोजन संपन्न होणार आहे. त्यामुळे तालुक्यात आमोदे गावाने तीर्थक्षेत्र क्षेत्रात भरारी घेतली असून धार्मिक आस्थेचे स्थान म्हणून उदयास येत आहे. व धार्मिक तीर्थक्षेत्रात विकासात्मक वाटचाल गावाने सुरू केली आहे.
गावातील नियोजित श्री कुलस्वामिनी कैला माता व श्री कुलस्वामिनी बान माता मंदिरासाठी गावातीलच स्वर्गीय भिमसिंग जी देशमुख (पोलीस) यांच्या स्मरणार्थ राजकोरबाई भीमसिंह देशमुख या दानशूर व्यक्तिमत्वाने दहा लाख रुपयांची देणगी आहे.
तसेच गावातील दानशूर व्यक्तिमत्व श्याम सिंग नगा गिरासे यांनी देखील मंदिरासाठी देणगी जाहीर केलीआहे.
आज दिनांक 28 नोव्हेंबर रोजी सकाळी दहा वाजता या दोन्ही मंदिरांच्या भूमिपूजन कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी गावातील दानशूर व्यक्तिमत्त्वांच्या सन्मान गावाच्या प्रथम नागरिक सरपंच सौ हर्षाली देशमुख यांच्या हस्ते करण्यात आला. या प्रसंगी कुलदेवतेच्या मंदिरासाठी गावातून नागरिकांनी 51 हजार रुपये, 21 हजार रुपये ,11000 रुपये ,पाच हजार रुपये व इतर मंदिर निर्मनासाठी आवश्यक असलेल्या वस्तूंचे दान, व यथाशक्ती या देणगी स्वरूपात लाखो रुपयांची प्राथमिक देणगी जाहीर केले आहे. त्यामुळे लवकरच आमोदे गावात कुलस्वामिनी कैला माता व कुलस्वामिनी बाण मातेचे भव्य असे मंदिर साकारण्यात येणार आहे.
शिवाय तालुक्यातील व जिल्ह्यातील व समाज बांधवांना आवाहन करण्यात येत आहे की या पवित्र अश्या धार्मिक कामात ज्यांना कोणाला आपले योगदान द्यायचे असेल त्यांनी आमोदे गावातील सारंगेश्वर महादेव मंदिर समिती भेट देऊन आपली देणगी द्यावी असे जाहीर आवाहन देखील करण्यात आले आहे.
सदर कार्यक्रमाची प्रस्तावना यशवंत निकवाडे सर व सूत्रसंचालन राज देशमुख यांनी केले.
सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सारंगेश्वर महादेव समिती समस्त ग्रामस्थ आमोदे व देणगीदार व ग्रामपंचायत आमोदे गट नेता जगदीश देशमुख, रणजीत अण्णा देशमुख ज्येष्ठ समाज बांधव यांनी परिश्रम घेतले.

