वाल्मीक ऋषी विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी साधला संवाद जर्मनीशी




ज्ञानोपासक शिक्षण मंडळी संचलित वाल्मीक ऋषी माध्यमिक विद्यालय तावखेडा (प्र. न.) ता शिंदखेडा जि धुळे येथील विद्यार्थ्यांनी जर्मनीशी संवाद साधला. याप्रसंगी विद्यालयाच्या कर्तव्यदक्ष मुख्याध्यापिका श्रीमती पी.पी. महिरे-वाघ व तंत्रस्नेही शिक्षक श्री. एन.पी. भिलाणे यांनी भारताचे जर्मन स्थित दूतावास डॉ.सुयश चव्हाण व मार्गदर्शक शिक्षक केदार सर आणि तेथील मराठी मंडळ यांच्याशी संपर्क करून विद्यालयातील विद्यार्थ्यांना जर्मनी भाषा शिकण्यासाठी प्रोत्साहित केले जेणेकरून जर्मनीतील संधी उपलब्ध होईल. जर्मनी या प्रगत देशाचा व तेथील तंत्रज्ञानाचा आपल्याला फायदा करून घ्यायचा असेल तर जर्मनी भाषा शिकणे गरजेचे आहे. त्याचप्रमाणे जगात काय चालू आहे? या संदर्भातील माहिती मिळविणे हा या उपक्रमामागील उद्देश आहे. डॉ. सुयश चव्हाण यांनी हा उपक्रम महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी व ग्लोबल महाराष्ट्र होण्यासाठी प्रयत्न चालविलेले आहेत. जर्मन भाषा शिकताना विद्यार्थ्यांनी मनमुराद आनंद लुटला याप्रसंगी विद्यार्थ्यांनी विविध प्रश्न विचारून आपल्या शंकांचे समाधान केले. यासाठी विद्यालयातील उप मुख्याध्यापक श्री. एस. एस. पाटील ,श्री .ए.के. सावंत ,श्री. सी. झेड. कुवर ,श्रीमती एम.डी. कुवर ,श्री. पी. एच. लांडगे ,श्री नितीन पाटील व शिक्षकेत्तर कर्मचारी श्री. जे. एन. राजपूत ,श्री दिलीप आबा पाटील, श्री चुडामन नाना धनगर यांनी मोलाचे सहकार्य केले

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने