नंदुरबार- नंदुरबार जिल्हा पोलीस दलातील पोलीस _अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्याने मोठा फेरबदल_ झाला आहे नंदुरबारचे नवे अप्पर पोलीस अधीक्षक म्हणून निलेश तांबे यांची नियुक्ती झाली आहे. तांबे हे मालेगाव नाशिक ग्रामीण येथून नंदुरबारचे अप्पर पोलीस अधीक्षक विजय पवार यांच्या जागी आले आहेत. तसेच नंदुरबार जिल्हा पोलीस दलातील पोलीस निरीक्षकांच्या बदल्या झाल्या असून नंदुरबार स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पोलिस निरीक्षकपदी किरणकुमार खेडकर यांची नियुक्ती झाली आहे.
नंदुरबार जिल्हा पोलीस दलातील दलातील पाच पोलीस निरीक्षकांच्या बदल्यांसह नवे अप्पर पोलीस अधीक्षक आले आहे. नंदुरबार जिल्ह्याच्या अप्पर पोलीस अधीक्षकपदी असलेले विजय पवार हे गेल्या दोन महिन्यांपासून काही कारणास्तव रजेवर आहेत. काल रात्री अचानक मालेगाव ग्रामीणचे अप्पर पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांची नंदुरबार जिल्ह्याच्या अप्पर पोलीस अधीक्षक पदी नियुक्ती करण्यात आली आहे परंतु नंदुरबारचे अप्पर पोलीस अधीक्षक विजय पवार यांची अद्याप पर्यंत नियुक्ती करण्यात आली नाही. तसेच नंदुरबार स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेसह पाच पोलीस निरीक्षकांच्या बदल्या झाल्या आहेत. नंदुरबार एस सी बी चे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांची पुन्हा नंदुरबार शहर पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक पदी बदली करण्यात आली आहे तसेच त्यांच्या पोलीस निरीक्षक म्हणून नंदुरबार शहर चे पोलीस निरीक्षक किरण कुमार खेडकर यांची खेडकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे शहादा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दीपक बुधवंत यांची तब्बल तिसऱ्यांदा नियंत्रण कक्षात जमा केल्याची कार्यवाही झाली आहे. तर शहादा पोलीस निरीक्षकपदी अक्कलकव्याचे अन्साराम आगारकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच नियंत्रण कक्षातील पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे यांची नवापूर पोलीस ठाण्याच्या पोलिस निरीक्षक पदी नियुक्ती करण्यात आली आहे. पोलीस निरीक्षकांच्या बदल्या जिल्हा पोलीस अधीक्षक पी.आर. पाटील यांनी केल्या आहेत. जिल्ह्यातील पाच पोलीस निरीक्षकांचा अप्पर पोलीस अधीक्षकांची बदली झाल्याने हा विषय पोलीस दलातील चर्चेचा विषय ठरला आहे.
