नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक मा.डॉ. श्री. बी. जी. शेखर पाटील यांनी संपूर्ण नाशिक परिक्षेत्रात अवैध दारु तस्करांची माहिती काढुन त्यांचेवर कठोर कारवाई करण्याचे व अवैध धंद्यांचे समुळ उच्चाटन करण्याचे आदेश दिले होते. त्या अनुषंगाने नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. पी. आर. पाटील यांनी त्याबाबतचे आदेश गुन्हे बैठकीत सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांना निर्देश दिले होते..
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. रविंद्र कळमकर यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, दिनांक 06/11/2022 रोजी अंकलेश्वर-बऱ्हाणपूर महामार्गावरून अक्कलकुवा मार्गे एका आयशर वाहनामधून किराणा सामानाच्यामागे अवैध देशी विदेशी दारु व वियरची चोरटी वाहतुक होणार आहे. त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. रविंद्र कळमकर यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे सहा. पोलीस निरीक्षक श्री. संदीप पाटील यांचे नेतृत्वाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे एक पथक तयार करुन त्यांना योग्य ते मार्गदर्शन करुन तात्काळ कारवाई करणेबाबत आदेशीत केले.
स्थानिक गुन्हे शाखा व सिमा तपासणी नाक्याच्या पथकाने अंकलेश्वर- बऱ्हाणपूर महामार्गावर अक्कलकुवा पोलीस ठाणे हद्दीतील गव्हाळी सिमा तपासणी नाक्याजवळ सापळा लावला. दिनांक 06/11/2022 रोजी सायंकाळी साधारणपणे सायंकाळी सुमारे 05.00 वा. सुमारास सिमा तपासणी नाका येथे मर्यादेपेक्षा जास्त भार असलेले आयशर वाहन आले म्हणून सिमा तपासणी नाक्यावरील स्थानिक गुन्हे शाखा व सिमा तपासणी नाक्यावरील पथकाने त्या वाहनास थांबवून वाहन चालकाला वाहनात काय भरले आहे ? व वाहनाचे कागदपत्र बाबत विचारपुस केली असता तो वाहन चालक उडवा उडवीची उत्तरे देवू लागला, म्हणून सिमा तपासणी नाक्यावरील पथकाने ते आयशर वाहन रस्त्याच्या बाजुला घेण्यास सांगितले. तसेच त्या आयशर वाहनाचे वजन केले असता त्यामध्ये प्रमाणापेक्षा जास्त वजन भरल्याचे दिसून आले. त्याच दरम्यान आयशरवरील वाहन चालकाने वाहन बाजुला घेवून तेथून पळ काढला.
स्थानिक गुन्हे शाखा व सिमा तपासणी नाक्यावरील पथकाने वाहनाची पाहणी केली असता त्यात खालीलप्रमाणे दारु आढळून आली
1) 08 लाख 28 हजार रुपये किमंतीची MOUNT'S 6000 SUPER STRONG बियरचे 500 एम. एल. चे एकुण 345 पत्राचे टिन व त्यामध्ये एकुण 8280 पत्राचे टिन. 2) 20 हजार 16 रुपये किमतीची रॉयल ब्ल्यू माल्ट व्हिसकीचे एकुण 350 खोके, व त्यामध्ये
एकुण 16,800 सिलबंद बाटल्या. 3) 26 हजार 400 रुपये किमतीचे मुरमुरे भरलेल्या प्लास्टीकच्या एकुण 88 गोण्या. 4) 10 लाख रुपये किमंतीचे आयशर वाहन क्रमांक MP-09 GE-6551 असा नंबर असलेले
असा एकुण 38 लाख 40 हजार 400 रुपये किमंतीचा मुद्देमाल जप्त करुन
अक्कलकुवा पोलीस ठाणे येथे आयशर वाहन क्रमांक MP-09 GE-6551 हिचेवरील वाहन
चालकाविरुद् महाराष्ट्र दारुबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
सदरची कारवाई नंदुरबार जिल्ह्याचे प्रभारी पोलीस अधीक्षक श्री. प्रशांत बच्छाव यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री रविंद्र कळमकर, सहा. पोलीस निरीक्षक श्री. संदीप पाटील, पोलीस उप निरीक्षक श्री. अनिल गोसावी, पोलीस हवालदार मुकेश तावडे, सजन वाघ, मनोज नाईक, जितेंद्र अहिरराव, अविनाश चव्हाण, किरण मोरे, तुषार पाडवी यांचे पथकाने केली आहे.
