इंदापूर तालुक्यातील शेतकऱ्यांना नियोजित लाकडी-निंबोडी योजनेचा अधिक फायदा होण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न करणार- हर्षवर्धन पाटील प्रतिनिधी दत्ता पारेकर




  
 पुणे:नियोजित लाकडी-निंबोडी उपसा सिंचन योजना तयार होत आहे, या योजनेमध्ये इंदापूर तालुक्यातील लाभ क्षेत्रामध्ये असलेल्या गावांच्या क्षेत्राचे प्रमाण कमी झालेले असून ते वाढवून मिळण्यासाठी व नियोजित लाकडी योजनेचा फायदा इंदापूर तालुक्यातील शेतकऱ्यांना जास्तीत जास्त होण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न व्हावेत यासाठी लाकडी निंबोडी उपसा सिंचन बचाव समितीचे प्रमुख हनुमंत काजळे यांनी आयोजित केलेल्या बैठकीस मार्गदर्शन करताना राज्याचे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी नियोजित लाकडी-निंबोडी योजनेचा फायदा इंदापूर तालुक्यातील शेतकऱ्यांना जास्तीत जास्त होण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.
   हर्षवर्धन पाटील म्हणाले की,' सध्याचे सरकार हे जनतेचे सरकार असून जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी ते कटिबद्ध आहे.
   नियोजित लाकडी-निंबोडी उपसा सिंचन योजनेच्या माध्यमातून इंदापूर तालुक्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांना कसा लाभ होईल यासाठी शासन स्तरावर लागेल ती मदत करण्याची ग्वाही  माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी उपस्थित शेतकरी बांधवांना दिली.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने