राष्ट्रवादी युवक काँग्रेसतर्फे खोकेदार सरकारचा निषेध करीत आंदोलन





महाराष्ट्राचे उद्योग गुजरातच्या घशात घालणाऱ्या शिंदे- फडवणीस यांच्या खोकेदार सरकाराच्या विरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेसतर्फे सोमवारी सकाळी शिरपूर प्रांताधिकारी कार्यालयाबाहेर निषेध आंदोलन करून प्रांताधिकारी यांना निवेदन देण्यात आले




          राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे  "उद्योगाचे विमान गुजरातला बेरोजगारीचे गाजर मराठी तरुणाला" हे राज्यव्यापी आंदोलन सोमवार 31 ऑक्टोबर रोजी करण्यात आले त्यामुळे शिरपुर येथे देखील जिल्हा व तालुका राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे शिंदे- फडणीस यांच्या खोकेदार सरकारचा घोषणाबाजी करून निषेध करण्यात आला.आंदोलनानंतर प्रांताधिकारी यांना निवेदन देण्यात आले.याप्रसंगी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ.मनोज महाजन,राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ज्येष्ठ नेते रमेश आबा करनकाळ,हेमराज राजपूत, सय्यद अशपाक,दीपक महाजन,बाळासाहेब पाटील, रमेश शिंपी, राजेंद्र पाटील, गौरव पाटील,राहुल कोळी, बाजीराव वसावे,दिनेश गिरासे ,शेख वाजिद रशीद युवराज पाटील आदी कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने