नंदुरबार येथे राष्ट्रीय एकता दौड संपन्न* *जिल्हाधिकाऱ्यांनी दिली राष्ट्रीय एकात्मितेची शपथ*



नंदुरबार, दि. 31  : लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त  जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद,जिल्हा पोलीस दल, नगरपरिषद, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय तसेच भामरे क्लासेस व आबाजी स्पोर्टस यांच्या संयुक्त विद्यमाने आज राष्ट्रीय एकता  दौड उत्साहात संपन्न झाली.

यावेळी जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांनी लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या  पुतळयास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले यानंतर त्यांनी उपस्थितांना राष्ट्रीय एकता दिवसाची शपथ देवून मान्यवराच्या हस्ते राष्ट्रीय एकता दौडला हिरवी झेंडी दाखवून प्रांरभ करण्यात आला. ही रॅली नगरपालिकेच्या हुतात्मा उद्यानापासून सुरुवात होऊन जुनी नगर पालिका चौक, अंधारे चौक मार्गे छत्रपती शिवाजी नाटयमंदीर येथे रॅलीचा समारोप झाला. रॅलीच्या माध्यमातून ‘आम्ही सर्व एक’ असल्याचा संदेश देण्यात आला.

रॅलीत मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे, अति.मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोदकुमार पवार, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.गोविंद चौधरी, जिल्हा क्रीडा अधिकारी सुनंदा पाटील, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) सतिष चौधरी, जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य रमेश चौधरी, गटशिक्षणाधिकारी निलेश पाटील, नगरसेविका ज्योती पाटील, शिव छत्रपती पुरस्कारार्थी बळवंत निकुंभ, यशवंत विद्यालयाचे प्राचार्य शिवाजी पाटील, टेनिक्वाईट संघटनेचे उपाध्यक्ष श्रीराम मोडक, भामरे क्लासेसचे संचालक युवराज भामरे, तसेच विद्यार्थी, खेळाडू,नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते. एकता दौड यशस्वी करण्यासाठी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाचे मुकेश बारी, महेंद्र काटे व कविता राठोड तसेच आबाजी स्पोर्टसचे जगदिश वंजारी, मनिष सनेर, अमोल चित्ते, गोपाल चव्हाण, योगेश माळी, प्रदिप माळी, राकेश चौधरी, गीता निकम यांनी परिश्रम घेतले तर प्रास्ताविक प्रा. मयुर ठाकरे यांनी केले.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने