शिरपुर(प्रतिनिधी)सनातन धर्माला आणि हिंदू धर्माचे आराध्य दैवत श्रीरामाची ओळख करून देणाऱ्या महर्षी वाल्मिक ऋषींचे वंशज आदिवासी कोळी समाज असून ही शिक्षणापासून वंचित असून अजूनही मागास आहे त्यामुळे कोळी समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासनाने सर्वोतोपरी प्रयत्न केला पाहिजे असे शिरपूर वरवाडे नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष भूपेश भाई पटेल यांनी प्रतिपादन करून शिरपुर शहरात वाल्मिक ऋषी ट्रस्टची स्थापना करावी त्यासाठी 1 लाखाचा निधी जाहीर करून दरवर्षी एक लाखाची वाढ करण्यात येईल त्या निधीच्या व्याजातून समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करून पारितोषिक देण्यात यावे आणि शहरात वाल्मिक ऋषी मंदिरासाठी जागा उपलब्ध करून मंदिर बांधकामासाठी आवश्यक तो निधीची पूर्तता स्वतः करू असे जाहीर केले.ते शिरपूर शहरातील कुंभारटेक परिसरातील कोळी वाड्यात महर्षी वाल्मिक ऋषी जयंती निमित्ताने आयोजित कार्यक्रमात बोलत होते.यावेळी त्यांनी महर्षी वाल्मिकी ऋषीच्या प्रतिमेचे पूजन करीत महर्षी वाल्मिकी ऋषी चौकाचे उद्घाटन केले.शिरपूर शहरासह तालुक्यात रविवारी महर्षी वाल्मिक ऋषी जयंती निमित्ताने कोळी समाजतर्फे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.रविवारी कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी महर्षी वाल्मिक ऋषी जयंती उत्साहात आणि आनंदात सर्वत्र साजरा करण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून सकाळी 11 वाजेच्या सुमारास कुंभारटेक परिसरात महर्षी वाल्मिक ऋषी चौकाचे उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर शहरातून समाज बांधवांनी मोटारसायकल रॅली काढण्यात आली आणि सायंकाळी महर्षी वाल्मिक ऋषी जयंतीनिमित्त भय रॅली काढण्यात येणार आहे. यावेळी कोळी समाजातील अनेक मान्यवर उपस्थित होते. तसेच शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रविंद्र देशमुख एपीआय गणेश फड,पीएसआय संदीप मुरकुटे, गणेश कुटे यांच्या नेतृत्वात चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
शिरपूर शहरातील कुंभारटेक परिसरातील कोळी वाड्यात महर्षी वाल्मिक ऋषी जयंती उत्साहात साजरा
byMahendra Rajput
-
0
