मोहम्मद पैगंबर जयंती निमित्त शिरपूरात भव्य मिरवणूक व विविध उपक्रम* प्रतिनिधी




इस्लाम धर्माचे संस्थापक प्रेषित मोहम्मद पैगंबर सल्ललाहु व अलै व सल्लम यांच्या जन्म वीस एप्रिल ५७०इसवी सना मध्ये अरबस्तानातिल मक्का शहरात झाला होता,
      इस्लाम धर्मात एकूण एक लाख चोवीस हजार पैगंबर इस्लाम धर्माचा प्रचार करण्यासाठी आले होते, मोहम्मद पैगंबर सल्ललाहु व अलै व सल्लम, हे इस्लाम धर्मातील अंतिम पैगंबर ठरले,पैगंबर मोहम्मद यांनी इस्लाम धर्माचे प्रचार प्रसार करून अल्लाह परमेश्वर एकच आहे आणि माणूसकी हीच खरा धर्म आहे, हे लोकांना शिकविले,
        अंतिम प्रेषित मोहम्मद पैगंबर यांची जयंती निमित्त शिरपूर शहरात भव्य मिरवणूक चा पारंपारिक पद्धतीने जामा मस्जिद कडून निघून मारवाडी गल्ली,मदिना मोहल्ला,कुंभार टेक,मौलाना आझाद चौक जैन गल्ली,खाटीक गल्ली पांच कंदील, होऊन अरूनावती नादित सामूहिक नमाज पठण करण्यात आले,तसेच  विविध ठिकाणी मोहल्यांची सजवाट करण्यात आली होती,तसेच कुंभार टेक,परिसरात गौसीया मस्जिद जवळ व मदिना मोहल्यात सामूहिक कुराण पठणचा  कार्यक्रम ठेवण्यात आला होता,तसेच मदिना मोहल्लयात गोरगरीब लोकांना जेवण देण्यात आले, बागबान जमात यांचा 
मतिमंद मुलांच्या शाळेत जेवण वितरण करून 
 जल्लोषात साजरा केले,
मोहम्मदिया हॉल,आदर्श नगर,नत्थु नगर,मंडाई मोहल्ला,मौलाना आझाद चौक, ईलाही चौक,लोहार गल्ली, किस्मत नगर तसेच विविध ठिकाणी शांततेत मोहम्मद पैगंबर जयंती साजरा करण्यात आला,

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने