वीस पटसंख्या असलेल्या शाळा बंद करू नका पुण्यातील मावळात पालकांचे पाल्यासह आंदोलन प्रतिनिधी दत्ता पारेकर




पुणे:वीस पटसंख्येच्या आत संख्या असणाऱ्या शाळा राज्य सरकारने बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. मावळमधील आदिवासी भागातून या निर्णयला मोठा विरोध होताना दिसत आहे.

‘वीस पटसंख्या असलेल्या शाळा बंद करू नका’; पुण्यातील मावळात पालकांचे पाल्यासह आंदोलन
पुण्यातील मावळात पालकांचे पाल्यासह आंदोलन
राज्यातील वीस पटसंख्येच्या आतील शाळा बंद करण्याच्या हालचाली सरकारकडून सुरू आहेत. शिंदे- फडणवीस सरकारच्या या धोरणाविरोधात वाड्या, वस्ती आणि ग्रामीण भागातील पालकांनी नाराजी व्यक्त केली असून सरकारच्या विरोधात आंदोलन सुरू केलं आहे. पुण्यातील मावळ परिसरात आदिवासी बांधव राहतात. अशा ठिकाणी वीस पटसंख्या असलेल्या शाळा आहेत. त्यामुळं राज्यसरकारच्या धोरणाविरोधात आदिवासी बांधवांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. स्थानिक आमदार सुनील शेळके यांनी देखील विरोध दर्शविला आहे.

मावळमधील कोथुर्रने, वाघजाई वस्ती येथे पालकांनी पाल्यासह आंदोलन केलं. आदिवासी पालक मोलमजुरी करून मुलांना शिकवत आहेत. आमच्यावर जी वेळ आली आहे, ती मुलांवर येऊ नये अशी अपेक्षा पालकांनी व्यक्त केली आहे. राज्यसरकारने धोरणात बदल न केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा पालकांनी दिला आहे.

मावळचे आमदार सुनील शेळके यांनी देखील अनेक प्रश्न उपस्थित करत शाळा बंद करू नयेत असं म्हटलं आहे. वाड्या, वस्ती येथील वीस पटा खालील शाळा बंद करू नयेत. शहरात किंवा दूरवर चा प्रवास करून मुलांना शिक्षण घ्यावं लागेल. याच नियोजन सरकार करणार का? गरिबी परिस्थिती असल्याने शिक्षणापासून मुलं वंचित राहतील असं आमदार शेळके म्हणाले आहेत.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने