पोकलेन कोसळले दगड खाणीत ; चालकाचा मृत्यू प्रतिनिधी दत्ता पारेकर




 पुणे:पोकलेन मशीन घसरून दगड खाणीतील पाण्यात पडले. पोकलेन मशीनच्या कॅबीन मध्ये असलेल्या ऑपरेटरला बाहेर पडताच आले नाही. त्यामुळे या पोकलेन मशीनचा ऑपरेटरचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना 
खेड तालुक्यातील मोई येथे घडली.  
 अनिल दिगांबर कालासरे ( वय २९, सध्या रा. मोई, मूळ रा. हिंगोली ) असे या दुर्घटनेत मृत्यू झालेल्या पोकलेन मशीनच्या ऑपरेटरचे नाव आहे. गुरुवारी सकाळी ऑपरेटर नेहमी प्रमाणे खाणीत कामासाठी जात असताना पोकलेन मशीन घसरले. ऑपरेटरचा मशीनवरील ताबा सुटल्याने मशीन अक्षरशः लोटळत खाणीतील पाण्यात पडले. पोकलेन मशीनच्या कॅबीनचे दरवाजे बंद असल्याने ऑपरेटर कालासरे याला बाहेरच पडता आले नाही; त्यातच त्याचा मृत्यू झाला. अन्य दोन मशिनच्या साह्याने पाण्यात पडलेले पोकलेन मशीन बाहेर काढण्यात आले. महाळुंगे पोलीस अधिक तपास करत आहेत.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने