ग्रामीण भागातील बस सेवा पुर्ववत करा- प्रशांत पाटील पुणे प्रतिनिधी दत्ता पारेकर



पुणे:सध्या दिवाळीचा सण सुरू असताना  इंदापूर येथील बस आगार  प्रमुखांनी गंगावळण व पडस्थळ व इतर ग्रामीण भागात  सुरू असलेली एस टी बस  सेवा बंद केली आहे. त्यामुळे गोर गरिब प्रवासाचे हाल होत आहेत‌ गोरगरीब दिवाळीचा सण साजरा करण्यासाठी इंदापूर बाजारपेठेचा वापर करत असतात. इंदापूरला येण्यासाठी प्रवासाचे साधन नसल्यामुळे ग्रामीण भागातील बरेच जणांची अजून खरेदी झालेली नाही गोरगरीब नागरिक सणापासून वंचित राहू नये यासाठी लवकरात लवकर एसटी सेवा सुरू करावी अन्यथा तीव्र स्वरूपाचे आंदोलन केले जाईल असा ईशारा प्रशांत पाटील संयोजक भारतीय जनता पार्टी युवा वाॅरियर्स पश्चिम महाराष्ट्र  यांनी आज निवेदनाद्वारे इंदापूर आगारप्रमुखांना दिला आहे .

यावेळी राजेंद्र पवार अनिकेत देवकर उद्धव भाऊ संकेत गायकवाड रोहन सावंत संदेश बनसोडे नवा पाटील आदेश कडाळे निलेश शिंदे इंदलकर सागर देवकर व इतर युवक उपस्थित होते.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने