वृक्षमित्र शिवाजी राजपूत यांच्या जैन इरिगेशन कंपनीकडून पुरस्कार देऊन सन्मान




शिरपूर - वृक्षमित्र शिवाजी राजपूत यांना जैन इरिगेशन सि. ली. जळगाव या कंपनीचा Beyond Grateful Award पुणे येथे हयात रेंजन्सी अँड रेसिडेन्सी, विमान नगर या 5स्टार हॉटेल मध्ये जैन इरिगेशन चे मालक श्री अनिलभाऊ भवरलाल जैन व श्री अजितभाऊ भवरलाल जैन यांच्या हस्ते वितरित करण्यात आला. जैन इरिगेशन चा टर्न ओव्हर 7200 करोड चा आहे,भारतात इरिगेशन क्षेत्रात 2 नंबर ची कंपनी आहे आंबा प्रोसेस मध्ये 1 नंबर आहे. केळी टिशू कल्चर मध्ये 1नंबर आहे. कांदा व भाजीपाला निर्लजिकरं मध्ये 3 नंबर आहे.700 टन पाईप दिवसाला उत्पादन आहे. विदेशात व राज्यात 33 उद्योग उभारलेले आहेत जगात 11000 डीलर आहेत,11200 कर्मचारी आहेत. अशा मल्टी नॅशनल कंपनी च्या मालकाच्या हस्ते वृक्षमित्र शिवाजी राजपूत यांना प्रतिष्ठा चा Beyond Grateful Award मिळाला आहे. जैन कंपनीत 28 वर्ष्या पासून निलेश ऍग्रो agency नावाने डीलर शिप घेऊन ठिबक सिंचन व्यवसायात कार्यरत आहे. शिवाजी राजपूत यांनी आतापर्यंत 6 हजार एकरावर शेतकऱ्यांचे ठिबक सिंचन केले आहे. पाण्याची मोठी बचत केली आहे शेतकऱ्यांचे आर्थिक जीवनमान उंचवण्यास फार मदत केली आहे. हे काम करत असताना त्यांनी वृक्ष लागवड व संवर्धन मध्ये मोठे काम केले आहे लाखो वृक्ष लाऊन पर्यावरण संतुलनाचे काम केले आहे. अशा व्यक्ती महत्व ला पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने