अवाजवी घरपट्टी कर रद्द करणेबाबत शिरपूर भाजपा तर्फे नगरपरिषदेस निवेदन

                                         


                शिरपू र : भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा शिरपूरच्या वतीने शिरपूर वरवाडे नगर परिषदेस निवेदन देण्यात आले. शिरपूर न.पा.मार्फत २० टक्के घरपट्टी करवाढ करुन नागरिकांना बीले अदा केली जात आहेत. शिरपूर शहराची परिस्थीती पाहता मागील काळात कोवीड महामारीमुळे आणि अतिवृष्टी अधिकचा पाऊस यामुळे शेतकरी, मजूर, दुकानदार, व्यापारी व सर्वसामान्य जनता आर्थिकदृष्ट्या अडचणीत सापडला आहे. व अडचणींच सामना करीत असतांना नागरिकांना घरपट्टी भाडेवाढ म्हणजे आर्थिक संकटात अधिकची भर पडली आहे. तरी शिरपूर वरवाडे नगरपरिषद शिरपूर दर वर्षी १०० टक्के घरपट्टी वसूली भरणा करीत असतात. या गोष्टींचा विचार करुन शिरपूर न.पा.ने अवाजवी २० टक्के घरपट्टी भाडेवाढ रद्द करण्यात यावी असे निवेदनात नमुद करण्यात आलेले आहे. सदरचे निवेदन हे धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीष महाजन, उपविभागीय अधिकारी शिरपूर व तह सिलदार शिरपूर यांना रवाना करण्यात आले आहे.भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा शिरपूरच्या वतीने निवेदन देतांना भाजपा शहराध्यक्ष हेमंत पाटील, जिल्हा सरचिटणीस अरुण धोबी, शहर सरचिटणीस महेंद्र पाटील, मुकेश पाटील, मोबीन शेख, संजय असापुरे, रोहित शेटे, युवा मोर्चा शहराध्यक्ष विक्की चौधरी, रवींद्र राजपूत, नितीन गिरासे, श्रीकृष्ण शर्मा, अरविंद बोरसे, गिरीश सनेर, दिनेश कोळी, किरण कोळी, नागेश कोळी, गणेश माळी, शेखर कोळी मंगेश कोळी, अमोल लोणारी, राहुल परदेशी, रोहित कोळी, अतुल सोनार, राजेश धोबी, मनोज शिंपी, नागेश कोळी आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने