धुळे : धुळे येथील शिक्षण क्षेत्रात अग्रेसर असलेल्या एस. व्ही. के. एम. अभियांत्रिकी महाविद्यालयातील ३० विद्यार्थ्यांची कॅम्पस प्लेसमेंटद्वारे विविध कार्यक्ष्रेत्रातील अग्रेसर असलेल्या कंपनी मध्ये निवड करण्यात आली.
विद्यार्थ्यांना वार्षिक ४.१७ ते ९ लाख वेतन मिळणार आहे. तसेच आत्तापर्यंत सध्या अंतिम वर्षात शिकत असलेल्या ९० हुन अधिक विद्यार्थ्यांची कॅम्पस प्लेसमेंटद्वारे विविध कंपन्यांतर्फे निवड करण्यात आली आहे आणि ७० विद्यार्थी प्लेसमेंट ऑफरच्या प्रतीक्षेत आहेत, अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. निलेश साळुंके यांनी दिली.
औद्योगिक क्षेत्रातील मनुष्यबळाकडे काही विशेष कौशल्य असल्याशिवाय त्यांना रोजगाराच्या संधी प्राप्त होत नाही. त्यामुळे महाविद्यालयीन कार्यकाळातच विद्यार्थ्यांनी अधिकाधिक कौशल्य आत्मसात केली पाहिजेत. शिक्षकांनी सुद्धा विद्यार्थ्यांना भिंतीबाहेरील कृतियुक्त शिक्षण देणे हि आजच्या काळाची गरज आहे. हेच ओळखून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी एस. व्ही के. एम. अभियांत्रिकी महाविद्यालय नेहमीच तत्पर असून, विद्यार्थ्यांना प्लेसमेंटद्वारे नोकरी मिळविण्यात सहाय्य करीत असते.
संगणक अभियांत्रिकीतील अक्षय ब्रम्हे या विद्यार्थ्याची नेटविन सिस्टम्स अँड सॉफ्टवेअर प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीमध्ये कनिष्ठ सॉफ्टवेअर अभियंता या पदी निवड झाली असून त्याला ९ लाख रुपयांची ऑफर मिळाल्याची माहिती महाविद्यालयाकडून देण्यात आली आहे. जेनपॅक्ट या कंपनीमध्ये तांत्रिक सल्लागार या पदी महाविद्यालयातील एकूण २५ विद्यार्थ्यांची निवड झाली असून त्यांना ४.१७ लाखांची ऑफर मिळाली आहे. या २५ विद्यार्थ्यांमध्ये महाविद्यालयातील संगणक विभागातील हिमांशू शर्मा, रोहित हटकर, चेतना बडगुजर, निक भागवत, कल्पेश पाटील, मोहित शिंदे, मयुरी जाधव, सेजल अरुजा, नेहा देवरे, श्रद्धा चांगुणे, वैभव पिंगळे या ११ विद्यार्थ्यांचा तर आयटी विभागातील प्रियांका वाकलकर, आर्यन नायर, धिरज पाटील, गायत्री भोसले, जुई गवळी, जितेश येलवे, सोमेश पाटील, भावेश लुल्ला, उमाकांत सावंत, मिहीर खंडेलवाल हे १० विद्यार्थी तसेच इलेक्ट्रिकल विभागातील मोहनीश ठाकूर, चंद्रशेखर बागुल, ऐश्वर्या भडगे, कांचन देवरे या ४ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. व्हीटेक सोल्यूशन्स या कंपनीमध्ये संगणक विभागातील विद्यार्थिनी श्रद्धा चांगुणे, आयटी विभागातील अक्षत पांचाळ, सानिका पाटील, तसेच मेकॅनिकल विभागातील प्रद्युम्न पाटील या विद्यार्थ्यांची निवड झाली असून त्यांना २.५२ लाख सोबत प्रोत्साहनपर भत्ते अशी ऑफर मिळाली आहे.
या कॅम्पस ड्राईव्हचे आयोजन अभियांत्रिकीचे ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर प्रा. करण शर्मा यांनी केले होते. त्यांना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. निलेश साळुंके, असि. रजिस्ट्रार अनमोल सूर्यवंशी यांचे मार्गदर्शन लाभले.
गुणवंत विद्यार्थ्यांचे एस. व्ही. के. एम. संस्थेचे अध्यक्ष माजी मंत्री आमदार अमरिशभाई पटेल, संस्थेचे सह-अध्यक्ष भूपेशभाई पटेल, व्यवस्थापन समितीचे सदस्य राजगोपाल भंडारी, प्राचार्य डॉ. निलेश साळुंखे आदींनी कौतुक केले.
.jpg)