आर. सी. पटेल फार्मसी महाविद्यालयाचा पृथ्वीक चौधरी याची व्ही मार्श हेल्थकेअर सोल्युशन, मुंबई येथे नियुक्ती व १२ विदयार्थ्यांची टी. सी. एस. मध्ये नियुक्ती




शिरपूर : आर. सी. पटेल फार्मसी महाविद्यालयाचाविद्यार्थी पृथ्वीक चौधरी याची व्ही मार्श हेल्थकेअर सोल्युशन, मुंबई येथे नियुक्ती व १२ विदयार्थ्यांची टी. सी. एस. मध्ये नियुक्ती झाली असून सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक करण्यात येत आहे.
 
व्ही. मार्श हेल्थकेअर सोल्युशन, मुंबई ही कंपनी हेल्थ केअर इंडस्ट्री, वाढती लोकसंख्या, नवीन साथीचे रोग, नियामक बदल, वाढता खर्च, संसाधनांचा तुटवडा (चिकित्सक, औषधे, प्रणाली इ.) या सर्वच घटकांचा अभ्यास करते. मोठ्या डेटाच्या सौजन्याने औषध शोधात संभाव्य यश, आरोग्य सेवा, ग्रीनफिल्ड प्रकल्प, आरोग्य तंत्रज्ञानातील गुंतवणूक संधी शोधणे आणि योग्य प्रादेशिक/आंतरराष्ट्रीय ऑपरेटिंग भागीदार शोधणे इ. कार्य करते. ऑनलाईन प्रणालीने निवड प्रक्रिया पार पडली. यामध्ये पृथ्वीक चौधरी या विद्यार्थ्याची बुद्धीमत्ता चाचणी, विषयातील ज्ञान, टेक्निकल नॉलेज या निकषाद्वारे निवड करण्यात आली. या विद्यार्थ्याला २.५० ते ३.५० लाख रुपये पर्यंत पॅकेज देण्यात येणार आहे.
तसेच १२ विदयार्थ्यांची टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (टी. सी. एस.) मध्ये नियुक्ती झाली. टी. सी. एस. प्रख्यात भारतीय व्यापारी संस्था आहे. ही टाटा उद्योग समूहातील सर्वाधिक बाजार मूल्यांकन असलेली व्यापारी संस्था आहे. या कंपनीमार्फत देखील निवड प्रक्रिया ऑनलाईन प्रणालीने आयोजित केली होती. या निवड प्रक्रियेत बुद्धीमत्ता चाचणी, विषयातील ज्ञान, टेक्निकल नॉलेज या निकषांवर आधारित होती. यामध्ये अनिल भोसले, साक्षी मराठे, रुतुजा पाटील, रुतुजा ब्राह्मणकर, सुयोग नांद्रे, सिमरन मंदान, गौरव शिरुडे, निकिता पाटील, तेजल चिंचोरे, जुनेद शेख या विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. या विद्यार्थ्यांना २.५० लाख रुपये पर्यंत पॅकेज देण्यात येणार आहे.

सदर निवड प्रक्रिया संपन्न होण्यासाठी महाविद्यालयाचे प्लेसमेंट अधिकारी डॉ. अनिल टाटीया, डॉ. हितेंद्र महाजन, ट्रेनिंग प्लेसमेंट ऑफिसर प्रा. सूरज इशीकर व प्रा. शीतल महाले यांनी विद्यार्थ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले.

संस्थेचे अध्यक्ष माजी मंत्री आमदार अमरिशभाई पटेल, कार्याध्यक्ष भूपेशभाई पटेल, उपाध्यक्ष राजगोपाल भंडारी, प्राचार्य डॉ. संजय सुराणा, उप-प्राचार्य डॉ. अतुल शिरखेडकर, प्राचार्य डॉ. नितिन हासवानी आदींनी निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले व भावी वाटचाली साठी शुभेच्छा दिल्या.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने