पुणे:इंदापूर तालुक्यामध्ये शुक्रवार दिनांक 21 ऑक्टोबर रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून होत असलेली शासकीय विकास कामांची भूमिपूजने व उद्घाटने बेकायदेशीर आहेत. या विकास कामांसाठी राज्य शासनाचा निधी असून पालकमंत्र्याची परवानगी न घेता राज्य शासनाचा आदेशाचा भंग करीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष चुकीच्या पद्धतीने ही उद्घाटने करीत आहेत अशी टीका भारतीय जनता पक्षाचे तालुकाध्यक्ष शरद जामदार यांनी केली.
शरद जामदार म्हणाले ,' वास्तविक पाहता मविआ सरकारच्या काळात शासनाने आदेश काढून राज्य सरकारचा निधी असणाऱ्या कोणत्याही शासकीय विकास कामांच्या उद्घाटनासाठी पालकमंत्र्याची परवानगीची आवश्यकता असल्याचे सांगितले होते. परंतु सध्या इंदापूर तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार ,आमदाराकडून होत असणारी उद्घाटने ही बेकायदेशीर आहेत. राज्य सरकारची किंवा पालकमंत्र्याची परवानगी न घेता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तालुक्यामध्ये उद्घाटनांमध्ये व्यस्त असल्याचे दिसून येत आहे. इंदापूर तालुक्यामध्ये सध्या विरोधकांना कोणतेही काम नसल्याने आपल्या पक्षाचा राजकीय अजेंडा राबवण्यासाठी नियमबाह्य पद्धतीने ते उद्घाटन करण्यावर ते भर देत आहेत. सरकारी अधिकाऱ्यांना अशा कार्यक्रमासाठी उपस्थित राहता येत नाही. शासकीय अधिकारी अशा कार्यक्रमासाठी उपस्थित राहिल्यास नियमांचे उल्लंघन होते.
.jpeg)