होळनांथे प्रतिनिधी - शिरपूर तालुक्यातील प्रियदर्शनी सहकारी सूतगिरणीच्या संचालकांची निवड नुकतीच जाहीर करण्यात आले असून यात होळनांथे येथील रमेश बन्सीलाल कोळी यांची संचालक पदावर बिनविरोध निवड जाहीर झाले आहे.
होळनांथे परिसरातील एका सामान्य कुटुंबातील व्यक्तीची सूत गिरणी सारख्या मोठ्या संस्थेवर संचालक पदावर निवड होणे ही अभिमानाची बाब असून रमेश कोळी हे आमदार अमरिशभाई पटेल यांचे कट्टर समर्थक आहेत. या आधी त्यांनी स्वर्गीय डॉक्टर डी बी पाटील यांच्यासोबत पक्षाचे काम केले असून आता ते जिल्हा परिषद सदस्य संजय पाटील यांच्यासोबत सक्रिय कार्यकर्ता म्हणून काम करत आहे. सध्या ते तंटामुक्ती अध्यक्ष म्हणून गाव परिसरात काम पाहत असून त्यांना मिळालेल्या नवीन जबाबदारीच्या त्यांना गाव परिसरातून शुभेच्छांचा वर्षाव होत असून त्यांच्या या निवडीबद्दल जिल्हा परिषद सदस्य संजय पाटील माजी उपसरपंच प्रमोद राजपूत, दयाराम मेहते, सुनील भोई यासह राजकीय व सामाजिक स्तरावरून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.
