पुणे: राज्यातील भाजपविरोधातील १६ मतदार संघांना टार्गेट करीत भाजपने बारामतीनंतर शिरुरकडे लक्ष घालून तिथे केंद्रीय मंत्री रेणुका सिंग यांना प्रभारी नेमले आहे. त्यामुळे लोकसभा-२०२४ ची तयारी सुरू केली आहे. या जागेवर भाजप कुणाला उतरविणार हे अद्याप गुलदस्त्यात असतानाच पक्षाच्या या चालीने येथील शिंदे गटाचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांचे काय होणार हाही मतदार संघातील सध्याचा सर्वाधिक राजकीय चर्चेचा व उत्सूकतेचा विषय झालेला आहे. केंद्रीय मंत्री रेणुका सिंग यांची शिरुर मतदार संघाच्या प्रभारीपदावर नियुक्ती झाल्यानंतर त्यांच्या तीन दिवसांच्या आढावा दौ-याला सुरुवात झाली असून आज खेड तालुक्यात त्यांनी ठिकठिकाणी कार्यक्रम घेतले. यावेळी भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते.
Tags
news