शंकररावजी पाटील (भाऊ) यांचे कार्य आदर्शवत- कीर्तन केसरी ह.भ.प. अक्रूर महाराज साखरे प्रतिनिधी दत्ता पारेकर






    पुणे:कर्मयोगी शंकरराव बाजीराव पाटील (भाऊ )यांच्या 16व्या पुण्यस्मरण दिनानिमित्त मंगळवार दि. 13 सप्टेंबर रोजी कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयात कीर्तन केसरी ह.भ.प. अक्रूर महाराज साखरे यांच्या  कीर्तनाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी बोलताना त्यांनी वरील मत व्यक्त केले. सांगोला विधानसभेचे आमदार शहाजी (बापू) पाटील व भारतीय जनता पक्षाचे नेते माजी मंत्री हर्षवर्धन पाटील  यावेळी उपस्थित होते.



   अक्रूर महाराज साखरे यांनी आपल्या सुश्राव्य कीर्तनामध्ये शंकररावजी पाटील तथा भाऊ यांच्या कार्याचे अनेक दाखले दिले. जिजाऊ माता व छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य, सैनिकांची शौर्यगाथा , समाजातील अनेक कार्याचे दाखले देत साखरे महाराजांनी तरुणांना संधीचे सोने करण्याचे आव्हान देखील यावेळी केले. राज्याचे माजी मंत्री व भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी भाऊंच्या कार्याचा वसा पुढे चालू ठेवला आहे.
   इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाच्या संचालकांच्या हस्ते भजनी मंडळातील सदस्यांचा यावेळी सन्मान करण्यात आला.
     सांगोला विधानसभेचे आमदार शहाजी बापू पाटील आणि माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी भाऊंच्या कार्याच्या आठवणींना यावेळी उजाळा दिला.
   कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रघुनाथ पन्हाळकर यांनी केले. आभार प्राचार्य डॉ.जीवन सरवदे यांनी मानले.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने