आर.सी.पटेल इंग्रजी माध्यमिक विद्यालयात इ. १० वी च्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा संपन्न



शिरपूर-येथील आर.सी.पटेल इंग्रजी माध्यमिक विद्यालय आदर्श नगर, शिरपूर येथे एस.एस.सी शालांत परीक्षेत 90%  टक्के गुणांपेक्षा अधिक गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव कार्यक्रम संपन्न झाला. सदर प्रसंगी विद्यालयाचे विद्यमान प्राचार्य डॉ. अमोल परब सर यांच्या प्रमुख उपस्थितीत विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व गुलाब पुष्प देऊन विद्यार्थ्यांच्या भविष्याच्या वाटचालीसाठी शुभेच्छा देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री. रविंद्र सोनगिरे सर यांनी केले. यात त्यांनी विद्यालयाची यशोगाथा तसेच यशाची उज्वल परंपरा विषयी सविस्तर माहिती मांडली. सदर कार्यक्रमासाठी विद्यालयाचे प्राचार्य डॉ.अमोल परब सर यांनी आपल्या मनोगतातून गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव, तसेच विद्यार्थ्यांचे कौतुक व मार्गदर्शन केले. तसेच इ. १० वी ला अध्यापन करणाऱ्या शिक्षकांच्या अथांग परिश्रमामुळे व पालकांच्या परिश्रमामुळे विद्यार्थ्यांनी यश संपादन केले असे प्रतिपादन केले. सदर कार्यक्रमाचे नियोजन, कार्यक्रमाची रूपरेषा श्रीमती. वैशाली खरे यांनी केली. सूत्रसंचालन श्रीमती मोनाली पाटील मॅडम यांनी केले. तसेच आभार प्रदर्शन श्री.उमेश शिंदे सर यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्राचार्य, विद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आदींनी परिश्रम घेतले.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने