चिमणी नगरवासीयांचा पुन्हा एकदा जलसमाधीचा इशारा वारंवार आंदोलने, निवेदने देऊन देखील आश्वासनांची पूर्तता नाही आदिवासी बांधवांच्या आरोग्याच्या प्रश्न, रोगराई पसरण्याची भीती





होळनांथे प्रतिनिधी - शिरपूर तालुक्यातील 
होळनांथे परिसराला लागून असलेले अजंदे बु. या गावातील चिमणी नगर ही वसाहत असून या वसाहतीत आदिवासी भिल्ल समाजातील नागरिकांची वस्ती आहे. सदर वस्तीला लागून सार्वजनिक बांधकाम विभागाची प्रजीमा 12 वर पाईप मोरीचे काम प्रलंबित आहे. त्यामुळे या परिसरात मोठ्या प्रमाणावर पाणी साचत असून आता पावसाळ्याच्या तोंडावर पाण्याच्या प्रमाणात मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. त्यामुळे येथील नागरिकांना अनेक प्रकारच्या समस्यांना सामोरे जावे लागत असून येथील बालकांच्या व नागरिकांच्या आरोग्याच्या प्रश्न गंभीर झाला आहे. याच मुद्द्यावरून मागील वर्षी चिमणी नगरच्या नागरिकांनी १५ ऑगस्ट रोजी याच पाण्यात उभे राहून जलसमाधी घेण्याच्या निर्णय जाहीर केला होता. त्यावेळेस प्रशासनातील सर्व अधिकाऱ्यांनी भेट देऊन नागरिकांना समज दिली होती व बांधकाम विभागाकडून ४ ते ५ दिवसात काम सुरू करू अशी आश्वासन या नागरिकांना देण्यात आले होते. 

मात्र आता वर्षभराच्या काळ लोटून देखील परिस्थिती जसे थे असून येथे कोणतेही प्रकारचे काम सुरू करण्यात आले नाही आणि त्यामुळे या परिसरात पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणावर दूषित पाणी साचले असून त्यामुळे लोक आजारी पडत असून रोगराई पसरल्याने काही बालकांच्या मृत्यू देखील झाला आहे. आणि या सर्व प्रकारास संबंधित प्रशासन जबाबदार आहे असा आरोप या नागरिकांनी केला आहे. पाण्यामुळे डास मच्छर डेंगू अनेक प्रकारचे विषारी कीटक तयार होत असून त्याच्या लोकांच्या जीवनावर व आरोग्यावर परिणाम होऊन रोगराई पसरत आहे. त्यामुळे या विषयाकडे दुर्लक्ष करून प्रशासन नागरिकांच्या जीवाशी खेळ खेळत आहे असा देखील आरोप नागरिकांनी केला आहे.

 या ठिकाणी पाण्याच्या पातळीत वाढ होऊन जर लोकांच्या घरात पाणी घुसले तर त्यांनी उदरनिर्वाह कसा करायचा हा देखील प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहत असून त्यांच्याकडे वैद्यकीय उपचारासाठी देखील पैसे नाहीत हे सर्व लोक रोजंदारीने आपला उदरनिर्वाह करत असतात.

वारंवार सांगून अर्ज निवेदने आंदोलने देऊन देखील प्रशासनाला आमचे जिवाची चिंता नसेल तर आणि ,४ ते ५ दिवसांमध्ये सदर समस्या सोडवण्यासाठी काम सुरू केले नाही तर मात्र आम्ही या सर्व गोष्टींना कंटाळून जलसमाधी घेऊ असा इशारा त्यांनी निवेदनातून दिला असून सदर निवेदनाची प्रत मा. जिल्हाधिकारी सो धुळे,सार्वजनिक बांधकाम विभाग धुळे व थाळनेर पोलीस स्टेशनच्या पोलीस अधिकाऱ्यांना दिले आहे.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने