शिरपूर प्रतिनिधी - शिरपूर तालुक्यातील होळनांथे विविध कार्यकारी सहकारी सोसायटी यांची बिनविरोधी निवडणुकीची परंपरा अबाधित ठेवत निवडणूक बिनविरोध करण्यात आली होती व सदस्यांची निवड जाहीर झाली होती.
यानंतरच्या टप्प्यात आज दिनांक ४ जुलै रोजी संस्थेचे चेअरमन व व्हाईस चेअरमन यांची निवड सर्व सदस्य व मार्गदर्शक मंडळी गावकरी व शेतकरी यांच्या उपस्थितीत बिनविरोध जाहीर करण्यात आली आहे. या चेअरमन पदावर प्रकाशसिंह निमडूसिंह सिसोदिया यांची निवड झाली असून व्हाईस चेअरमन पदावर नांथे गावातील मंगलसिंह पंडितसिंह राजपूत यांची निवड बिनविरोध जाहीर करण्यात आली आहे. यापूर्वी देखील प्रकाशसिंह सिसोदिया यांनी मागील २० वर्षांपासून चेअरमन पदाची धुरा यशस्वीरित्या सांभाळली आहे. व संस्थेची भरभराट केली आहे. आता पुन्हा एकदा संधी मिळाल्याने संस्थेच्या विकासाची वाटचालीसाठी मी कटीबद्ध आहे असे आश्वासन त्यांनी दिले आहे.
होळनांथे विविध कार्यकारी सेवा सोसायटी ची स्थापना ब्रिटिश काळात सन १९०७ मध्ये करण्यात आली होती. या नंतरच्या काळात माजी आमदार स्वर्गीय इंद्रसिंह भाऊसाहेब यांनी या सोसायटीची सूत्र काही वर्ष आपल्या हातात ठेवून या सोसायटीची भरभराट केली होती. यानंतर चेअरमन प्रकाश सिसोदिया यांनी देखील सदर सोसायटीला भरभराटीस आणण्यासाठी प्रयत्न करून सोसायटी नावलौकिक मिळवून दिला होता. मागील 118 वर्षांपासून सदर विविध कार्यकारी सोसायटी ची बिनविरोध निवडणुकीची परंपरा आहे आता देखील ही परंपरा अबाधित ठेवण्यात आली.
सदर सहकारी सोसायटीची होळनांथे
गावात मोठी वास्तू असून आपल्या सदस्यांना डिव्हीडंट रूपाने भेट देणारी राज्यातली ही पहिली विविध कार्यकारी सोसायटी आहे. सोसायटीचे आपल्या कारकीर्दीत आपली आर्थिक आवक 18 लाख रुपयांपासून आता तब्बल 3.5 करोड रुपयांपर्यंत कर्ज वाटपाचे टप्पा गाठला आहे. व नवनिर्वाचित सदस्यांनी यापुढे सोसायटीची आर्थिक पतपुरवठा अजून 1 करोड रुपयांपर्यंत वाढविण्याच्या मानस व्यक्त केला आहे.
सदरच्या निवडणूक प्रक्रियेत सदस्य म्हणून ज्ञानेश्वर रमेश सोमवंशी, अजंदे, भटू दौलत भोई, अजंदे, श्री राजेंद्र अंबरसिंग राजपूत, होळ , सौ. लताबाई नारायण राजपूत, अजंदे, सौ मीनाबाई ओमेंद्रसिंग राजपूत अजंदे, श्री नरेंद्र प्रताप सिंह सिसोदिया, होळ ,श्री .जितेंद्र विक्रम सिंग राजपूत, होळ, श्री प्रकाश निमडूसिंह राजपूत, अजंदे, एडवोकेट गोपाल रणजीत सिंग राजपूत , अजंदे,श्री धनंजय शामसिंग राजपूत ,नांथे, श्री धनसिंग दलपतसिंग राजपूत, नांथे,श्री मंगलसिंग पंडितसिंग राजपूत,नांथे श्री.वासुदेव धुडकु पवार, नांथे यांची बिनविरोध निवड या पूर्वीच जाहीर झाली आहे .
आता संस्थेचे चेअरमन व व्हाईस चेअरमन यांची देखील निवड बिनविरोध जाहीर झाल्याने सर्वत्र आनंद व्यक्त होत आहे व बिनविरोध झालेल्या उमेदवारांचे अभिनंदन करण्यात येत आहे.
सदरची निवड बिनविरोध करण्यासाठी विशेष प्रयत्न व मार्गदर्शन मार्केट कमिटी सभापती नरेंद्र प्रताप सिंह सिसोदिया ,एडवोकेट गोपाल सिंह राजपूत, सामाजिक कार्यकर्ते उज्वलसिंग इंद्रसिंह राजपूत, माजी व्हॉइस चेअरमन सुदामसिंह राजपूत,वासुदेवसिंह राजपूत, पंचायत समिती पंचायत समिती सदस्य जितेंद्र सिंह पवार नांथे, ग्रामपंचायत गटनेते व माजी सरपंच महेंद्र माणिक राजपूत, ग्रामपंचायतचे सरपंच जयपाल सिंह राजपूत, नांथे ग्रामपंचायत माजी सरपंच संजू भाईजी, ग्रामपंचायत माजी सरपंच कैलास पंडित, राजपूत माजी उपसरपंच अरविंद राजपूत, सामाजिक कार्यकर्ते दिलीप धुडकू राजपूत,
बापूसाहेब रवींद्र राजपूत नांथे, युवा कार्यकर्ते नितीन राजपूत ,राहुल राजपूत, विकी राजपूत, जगदीश राजपूत होळ ग्रामपंचायत माजी उपसरपंच प्रमोद राजपूत, सामाजिक कार्यकर्ते साहेबराव बापू सामाजिक कार्यकर्ते पंढरीनाथ अण्णा राजपूत, गावकरी आणि समस्त संचालक मंडळ विकास सोसायटी या वेळी उपस्थित होते.
निवडीनंतर विजयी उमेदवारांचा सत्कार करण्यात आला व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
