पुणे:इंदापूर येथील मातोश्री रमाबाई आंबेडकर विद्यार्थी वसतिगृह ट्रस्ट संचलित प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा, मुलांचे व मुलींचे अनुदानित वसतिगृह यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर शैक्षणिक संकुलात राजर्षी छत्रपती शाहू महाराजांची १४८ वी जयंती साजरी करण्यात आली. यावेळी इंदापूर नगरीच्या माजी नगरसेविका व संस्थेच्या विद्यमान अध्यक्ष आयु. शकुंतला रत्नाकर मखरे यांच्या हस्ते छत्रपती शाहू महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार , तथागत गौतम बुद्धांच्या मूर्तीस व संस्थेचे दिवंगत अध्यक्ष रत्नाकर मखरेंच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.
यावेळी कॉलेजच्या प्रा.रेश्मा झेंडे, उप- प्राचार्या सविता गोफणे, तसेच भिमाईचे मुख्याध्यापक साहेबराव पवार आदींची भाषणं झाली. यावेळी आयु.शकुंतला मखरेंनी उपस्थितांना छत्रपती शाहू महाराजांच्या जयंतीदिनी शुभेच्छा दिल्या.यावेळी संस्थेचे सचिव ॲड.समीर मखरे, प्राचार्या अनिता साळवे कार्यक्रमास उपस्थित होते.
यावेळी संस्थेतील शिक्षक,अधिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक नानासाहेब सानप यांनी केले.
