पत्रकार रणवीर राजपूत, ठाणे*
(मो.न.९९२०६७४२१९)
प्रत्येक माणसाच्या हृदयात भातृत्व-पितृत्वसह *ममत्व* देखील दडलेलं असतं. त्याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री,
रुग्णदूत श्री.एकनाथजी शिंदे हे होत.या औदार्याचा ठाणेकरांना निश्चितच अभिमान वाटेल.पहिल्या व दुसऱ्या कोरोना लाटेत असंख्य निरपराध लोकांना आपले प्राण गमवावे लागले होते.या प्राणघातक महामारी ने साऱ्या जगाला वेठीस धरले होते.अशा संकटमय प्रसंगी ठाणेकरांच्या जीवांचे रक्षण करण्यासाठी मदतीस वाऱ्यासारखा धावला तो.... शिवरायांच्या साताराचा क्षत्रिय मराठा श्रीमान एकनाथजी संभाजीराव शिंदे!
जातपात-धर्म-पंथ,पक्ष याचा तसूभरही विचार न करता... कोरोनापासून सर्वधर्मीय लोकांच्या जीवांचे रक्षण करण्यास सर्वप्रथम उडी घेतली....या मर्द मराठ्याने ! अशा प्रसंगी स्वतःच्या जीवाची पर्वा तर केलीच नाही.या निखारीच्या लढाईत लढताना....साहेबांना दोन वेळा कोरोनाची लागण झाली.पण हा मर्द गडी यत्किंचितही डगमगला नाही.दवाखान्यातून बाहेर निघताच कोरोनाचा नायनाट करण्यासाठी हत्तीच बळ एकवटून हा संभाजीचा सुपुत्र पुनश्च या अदृश्य शत्रूच्या विरुद्ध दंड थोपटून मैदानात उतरला.*प्राण गेला तरी बेहत्तर*,पण माघार नाही,हा प्रण त्यांनी केला.
या युद्धात मोलाची मदत मिळाली ती..डॉ श्रीकांत शिंदे फाउंडेशन अन् वंदनीय बाळासाहेब ठाकरे शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाची! यासाठी भाईंना तथा या दोन्ही सेवाभावी संस्थांना आम्हा ठाणेकरांचा मानाचा मुजरा! या संक्रमण काळात ठाणे महानगरपालिकेची देखील मोलाची साथ मिळाली.यास्तव त्यांचेही धन्यवाद!
या संघर्षादरम्यान एका बाका प्रसंगाला शिंदेसाहेब मोठ्या धैर्याने सामोरे गेलेत.अंगावर शहारे आणणारा हा हृदयद्रावक प्रसंग होता.ठाणे येथील एक साधेसुधे-कष्टाळू *पुजारी कुटुंब*....या परिवारातील प्रत्येक लहान- मोठा सदस्य हा *कोरोना पॉझिटिव्ह*....पण त्याच कुटुंबातील एक छोटी *चिमुरडी कु.प्रियांशी* मात्र सुदैवाने एकटी *निगेटिव्ह* निघाली.संपूर्ण पुजारी परिवार चिंताग्रस्त अन् हतबल! काय करावं ते सुचेना! अन् आसपास कोणाला सांगता येत नव्हतं,ना बोलवता येत होतं.अशा द्विधा मनस्थितीत हा परिवार गुरफटलेला होता.
ही गोष्ट शिंदेसाहेबांच्या कानी पडताच,ते कोणताही विचार न करता,*त्या* परिवाराच्या मदतीला ते वाऱ्याच्या वेगाने धावत आले.सर्वप्रथम त्यांनी लहान-मोठ्या सर्व कोरोनाबाधित सदस्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. त्यानंतर कु. प्रियांशी
जी निगेटिव्ह होती,तिला शिवसेना महिला आघाडीच्या सौ.रीनाताई
मुदलियार यांच्याकडे नेऊन त्यांना त्या मुलीच्या देखभाल व शुश्रुषाची जबाबदारी सोपविली.तसेच टीप टॉप प्लाझा येथे राहण्याची व्यवस्था करण्यात आली.रीनाताईंनी आईची भूमिका मोठ्या तनमनधनाने बजावली.त्याबद्दल मा.पालकमंत्र्यांनी ताईंचा गौरव करून कौतुक केलं.एवढे करून काम संपलेलं नव्हतं.तब्बल पंधरा दिवसांनंतर पुजारी परिवारवरील कोरोनाचा धोका टळल्यावर शिंदेसाहेबांनी त्या मुलीला आईवडिलांना सुखरूपपणे सोपविले.त्याप्रसंगी सर्वांच्या डोळ्यात आनंदाश्रू होते.पुजारी परिवाराने
शिंदेसाहेब अन्
सौ.मुदलियार मॅडमचे हात जोडून-डोळ्यात पाणी आणून आभार मानले.सदर दोन्ही धाडसी मातांना प्रणाम करून शिंदेसाहेबांनी त्यांचा निरोप घेतला.असा आहे हा हृदय हेलावून टाकणारा बाका प्रसंग! *पण जेथे *अनाथांचे नाथ एकनाथ* *आहेत....तेथे काय कुणाची भीती!*
*जय महाराष्ट्र!*
