शिंदखेडा तालुक्यातील मालपुर येथे आज वि.वि.ध. सहकारी सोसायटीच्या कार्यालयात ठिक बारा वाजता निवडणुक आधिकारी श्री.ग्रीश महाले. व त्यांचे सहकारी श्री.सुशिल महाजन यांच्या अध्यक्षाखाली निवडणुक प्रक्रिया अगदी शांतते व बिन विरोध पार पडली.
त्यांनी चेअरमन पदी श्री.प्रकाश भगवान पाटील यांची निवड केली.
तर व्हाय चेअरमनपदी सौ. आयु. सुरेखा लोटन इंदवे यांची निवड जाहिर केली. त्याप्रसंगी. जि.प.सदस्य श्री.महावीरसिंह रावल,श्री.रविंद्र पाटील, पञकार प्रभाकर आडगाळे, सोसायटीचे जेष्ठ माजी संचालक श्री.सदाशिव गोसावी, बारकु भोई, सी.बी.पाटील सर,श्रावण अहिरे,ऊप सरपंच श्री.अरुण धनगर, ऊत्तम भामरे,लोटन इंदवे, सदाशीव भलकार, रविंद्र राजपुत, समाधान धनगर, भटु रावल, आदि उपस्थित होते.
निवडणुक आधिकारी म्हणाले.कि.प्रकाश पाटील यांचा एकमेव अर्ज प्राप्त झाल्यामुळे त्यांना बिन विरोध विजय घोषात करतो. व त्यांनाअनुमोदनम्हणुन श्री.चंद्रसिंग गिरासे यांनी सह्या केल्या आहेत. अगदी शांततेत व सुरळित निवडणुक प्रक्रिया झाल्यामुळे मी तुमचा आभार मानतो.
तर कार्यक्रमाचे सुञ संचालन सोसायटीचे सचिव श्री.रविंद्र पाठक यांनी केले.
