नवापूर। लाईट बाजारात घंटीवाला चक्कीच्या दुकानाला भीषण आग लागल्याने आगीने रौद्ररूप धारण केले होते*





         नवापूर येथे लाईटबाजारात घंटीवाला चक्की च्या दुकानाला शॉट सर्किट मुळे भीषण आग लागल्याने आगीने रौद्ररूप धारण केले व दुकानाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. नवापुरचे अग्निक्षमक दल येण्यासाठी वेळ लागला पण गुजराथ येथून *व्यारा* चा अग्निक्षमक दल हे मोजक्या मिनिटात पोहचला फायर फायटर व्यारा यांनी येता बरोबरच मोर्चा हातात घेतला आणि आगीवर नियंत्रण मिळवले ह्या आगीत दुकान मालकाच्या सांगण्यानुसार व्यापाऱ्यांनी दिलेला माल हळद , मसाला असा अंदाजे 12 ते 13 लाखाचे मोठे नुकसान झाले आहे.
     नवापूर येथे गेल्या दोन ते तीन महिन्यात विजय इलेक्ट्रॉनिक्स दुकानाच्या घटने नंतर ही नवापुर नगरपालिकेचे निशफळ कारभार,निष्काळजीपणा व बेजबाबदारपणा लोकांसमोर उघळकीस आल्यानंतर ह्या विषया संबंधित विभागाच्या जिम्मेदार अधिकाऱ्यांनी भविष्यात असा निष्काळजीपणा होऊ नये त्या करीता न्युज चॅनल्स वर मोठमोठ्या गोष्टी सांगितल्या होत्या आपल्या यंत्रणेत लवकरात लवकर सुधारणा करू,नवीन इमर्जेनसी दुरध्वनी क्र. इश्यू करू व बॅकपसाठी अजून एक बंब उपलब्ध करू ह्या सगळ्या गोष्टी फक्त ताजा विषयाला थंड करण्यासाठी बोलले होते का...?  या प्रश्नाचे उत्तर पालिकेच्या जबाबदार अधिकाऱ्यांनी जनतेला दिले पाहिजे.
      ह्या घटने नंतर दुकान मालिक नगरपालिका प्रशासनावर प्रचंड नाराज आहे असे त्यांनी

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने