दोन दिवस ऊलटुनही अपघाती रुग्णाचा तपास लागेना बभळाज / प्रतिनिधी



शिरपूर तालुक्यातील तरडी येथील तरुण ,शिक्षक धिरज सोनवणे शिरपूर येथील एस.पी.डी.एम महाविद्यालयात शि‌क्षक असुन तरडी येथुन ये-जा करीत असतो.दि.३ मार्च २०२२ रोजी सायंकाळी शिरपूर येथुन दुचाकी एम एच १८ बीके ५६३१ या वाहनाने तरडी घरी येण्यास निघाला.



शिरपूर चोपडा रोडवरील भाटपूरा फाटा जवळील नाल्यात दुचाकीला अपघात होऊन पुला खाली पडला असल्याचे समजले.अपघाताची बातमी कळताच आजुबाजुच्या शेतात असलेले लोक धाऊन आले.तो पर्यंत शिरपूर कडून येणारी चोपडाकडे जाण्यासाठी मारूती कंपनीची इको गाडी उभी होती.त्यातुन चार पाच तरुन जख्मी तरुणास गाडीत बसवत लोकांना सांगितले की आम्ही रुग्णालयात घेऊन जात आहोत.या इको गाडीवर मागे पुढे नंबर नव्हता.जख्मीला घेऊन ही गाडी माघीरी शिरपूर कडे निघाली.परंतु गाडी जख्मीस घेऊन रूग्णालयात पोहचलीच नाही.ही माहीती रात्री ८/९ वाजेच्या च्या सुमारास थाळनेर पोलीस स्टेशनचे सपोनि उमेश बोरसे यांना कळविण्यात आली.माहीती कळताच सपोनि उमेश बोरसे व त्यांच्या कर्मचाऱ्यांनी शोध सुरू केला परंतु शोध लागला नाही.दि.४ रोजी सपनो उमेश बोरसे त्यांचे कर्मचारी,तरडीचे पोलीस पाटील कमलाकर, बभळाज पो.पा.नितीन जाधव, पोलीस मित्र राजकुमार जैन सह नातेवाईक यांनी शिरपूर,चोपडा,धुळे येथील सर्व रुग्णालयात जाऊन तपास केला.शिरपूर, सोनगिर, पेट्रोल पंप,ढाबे परीसरातील गावांमध्ये असलेले सर्व व्हिडिओ चित्रीकरणाची तपासणी सुरू असुन दोन दिवस उलटुनही इको गाडी व जख्मी शिक्षकाचा शोध लागला नसल्याने तालुक्यात एकच खळबळ माजली असुन चर्चांना ऊधान आले आहे.या बाबतीत संशयीत म्हणुन धिरज सोनवणे याचे सासरे दिलीप छगन चव्हाण व त्यांचा मुलगा बंटी दिलीप चव्हाण रा.सासवड पुणे यांच्या विरोधात भाऊ दशरथ भाऊराव सोनवणे यांनी अपहरणाचा गुन्हा थाळनेर पोलीस स्टेशनला दाखल करण्यात आला आहे.पोलीस अधिक्षक प्रविण पाटील, अप्पर अधीक्षक प्रशांत बच्छाव, शिरपूर पोलीस उपअधीक्षक अनिल माने यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि उमेश बोरसे व त्यांचे कर्मचारी पो.नाईक शामकांत ठाकुर व‌ नाईक सर्वतोपरी शोध घेत आहेत.सदर गाडी व जख्मी तरूणाच्य बाबतीत काही माहीती असल्यास थाळनेर पोलीस स्टेशसनशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने