अखेर कर्जमुक्ती नंतरच आजीबाईंचे आंदोलन स्थगित




शिरपूर प्रतिनिधी -  शिरपूर तालुक्यातील उंटावद येथील 70 वर्ष वयाच्या महिला शेतकरी आपणास कर्जमाफी मिळावी म्हणून सहाय्यक उपनिबंधक कार्यालय शिरपूर समोर आमरण उपोषणास दिनांक 02 मार्च पासून बसल्या होत्या. तालुक्यातील वयोवृद्ध शेतकरी महिला आपल्या न्याय्य हक्कांसाठी लढा देत असल्याने त्यांना अनेक सामाजिक कार्यकर्ते व शेतकरी संघटनांनी पाठिंबा देऊन त्यांचे मनोधैर्य वाढवण्याच्या प्रयत्न केला आहे.
महाराष्ट्र शासनाच्या छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजनेचा पात्र असून देखील या वयोवृद्ध शेतकरी महिलेचा कर्जमाफीचा लाभ हिरावला गेला होता याबाबत वारंवार प्रशासनास व बँक प्रशासनास तक्रार विनंती अर्ज करून देखील कोणताही ठोस निर्णय न घेतल्यामुळे अकेली आजीबाईंनी  2  मार्च पासून उपनिबंधक कार्यालय शिरपूर येथे आमरण उपोषण सुरू केले होते.

यापूर्वी त्यांनी शिरपूर येथील महाराष्ट्र बँकेतून एक लाख 48 हजार रुपयांचे कर्ज घेतले होते व नापिकीमुळे सदरच्या कर्जाची परतफेड होऊ शकली नव्हती मात्र शासनाच्या योजनेतून आपली कर्जमाफी होईल अशी अपेक्षा असताना त्यांच्या कर्जमाफीचा लाभ हिरावला गेल्यामुळे त्यांच्या वरील कर्ज स्थगित होते .कालांतराने त्यांच्या खात्यात जमा झालेल्या शेती उत्पन्नाच्या पैशातून बँकेने परस्पर कर्जे कापून घेतल्याने त्यांनी नाराजी व्यक्त करत कर्जमाफीची मागणी केली होती मात्र या बाबतीत तांत्रिक चुका झाले असून सदर महिला शेतकऱ्यांची कर्जमाफी च्या अर्ज आज सादर न झाल्यामुळे त्यांना कर्ज माफी मिळाली नाही असा खुलासा बँक प्रशासनाने केला होता. मात्र सदरच्या महिला शेतकरी या सतत सहा दिवसांपासून आमरण उपोषणावर असल्याने बँक प्रशासनाची चिंता वाढली होती .शिवाय त्यांना मोठ्या प्रमाणावर प्रसिद्धी मिळवून जनसमर्थन देखील मिळत होते. अखेर बँक प्रशासनाने आज याबाबतीत निर्णय घेऊन व आपल्या वरिष्ठांच्या मार्गदर्शनाने सदर महिला शेतकऱ्यास न्याय देण्याचा प्रयत्न केला असून आज बँकेने त्यांची मागणी मान्य करत त्यांचे उर्वरित कर्ज माफ करून त्यांना कर्जमाफीचा लाभ दिला आहे. त्यांच्या सातबारा वरील उतारा कोरा करून देण्याचे आश्वासन देत त्यांना यापुढील कर्ज देण्यास देखील बँक तयार आहे या आश्वासनावर या उपोषणाची सांगता आज दिनांक 7 मार्च रोजी दुपारी चार वाजता करण्यात आली. यावेळेस बँक प्रशासनाकडून सेवानिवृत्त शाखाधिकारी बापूसाहेब कलाल ,विद्यमान शाखाधिकारी वाणी साहेब व त्यांचे सहाय्यक कर्मचारी उपस्थित होते .सोबत या आंदोलनात आंदोलनाला खंबीरपणे साथ देणारे सामाजिक कार्यकर्त्या धुळे जिल्हा जागृती मंच च्या सरोज पाटील ,किसान विकास फौंडेशन चे मोहन पाटील, एडवोकेट गोपाल राजपूत ,प हेमराज राजपूत ओंकार जाधव, यांच्यासह विविध सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार बंधु या वेळेस उपस्थित होते.




 

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने