वरकुटे बु. येथे अफू या अंमली पदार्थाची शेती... प्रतिनिधी दत्ता पारेकर




पुणे:इंदापूर तालुक्यातील वरकुटे बु. येथील शेतात बेकायदेशीरपणे विनापरवाना व्यापारी व व्यवसायिक हेतुने लावलेली अफु या अंमली औषधीद्रव्य पदार्थाची 2,11,300 रुपये किंमतीची लागवड केलेली झाडे दिनांक 2 मार्च रोजी सायंकाळी 5.30 वाजण्याच्या सुमारास इंदापूर पोलिसांना आढळून आली.

या प्रकरणी आरोपी पांडुरंग नामदेव कुंभार व नवनाथ गणपत शिंदे दोघे रा. वरकुटे बु. ता.इंदापूर यांच्या विरुद्ध इंदापूर पोलिसांत अंमली औषधीद्रव्य व मनु: प्रभावी पदार्थ अधिनियम कायदा 1985 चे कलम 8,15,18,32,46 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आहे.

याबाबत पोलीस हवालदार सुरेंद्र जयवंत वाघ वय 43 वर्ष यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार सविस्तर माहिती अशी की, इंदापूर तालुक्यातील वरकुटे बु. येथील शेतकरी पांडुरंग नामदेव कुंभार यांची जमीन गट नंबर 24 व नवनाथ गणपत शिंदे विहिरीच्या कडेला जमीन गट नंबर 28/2 मध्ये भुईमूग व लसणाच्या पिकांमध्ये आंतरपीक म्हणून अफू या अंमली पदार्थाच्या झाडांची थोड्या थोड्या अंतराने बेकायदेशीरपणे विनापरवाना व्यापारी व व्यवसायिक हेतूने मानवी मेंदूवर विपरीत परिणाम करणारा अफूच्या ओल्या झाडांचे व बोंडांचे एकूण वजन 32 किलो तसेच अफुच्या बोंडा सह झाडांची एकूण किंमत अंदाजे 2,11,300 रुपयाची लागवड केलेली मिळून आले आहे. याप्रकरणी पुढील तपास इंदापूर पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक टी.वाय. मुजावर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक नागनाथ पाटील करीत आहेत.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने