लग्नाचे आमिष दाखवून केला बलात्कार सोशल मीडियावर मैत्रीचा घेतला गैर फायदा

 





धुळे - सध्या सोशल मीडियाचा वापर सर्वच क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर होत असून तरुणाईच्या हातात मोबाईल असल्याने प्रत्येक जण सोशल मीडियाचा वापर करत आहे मात्र हा वापर जितका चांगला तितकाच वाईट देखील ठरत आहे त्यामुळे सोशल मीडियाचा वापर करताना जरा जपून असे सांगण्याची वेळ आली आहे

 धुळे शहरातील देवपूर भागातील तरुणीशी सोशल मीडियावर मैत्री करून लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर धुळ्यासह अहमदाबाद येथे बलात्कार केल्याची घटना घडली आहे. तरुणीला जबरदस्तीने गर्भपाताच्या गोळ्या देण्यात आल्या. तसेच जातीवाचक शिवीगाळ केल्याने पोलिसांत अॅट्रासिटीसह बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या संदर्भात मिळालेल्या माहितीनुसार, देवपूरातील वाडीभोकर रोडवर असलेल्या इंदिरा नगरात राहणाऱ्या एका २१ वर्षीय तरुणीचे अवधान येथील कृष्णा प्रभाकर पाटील या २५ वर्षीय तरुणाने इंस्टाग्रामवर मैत्री करून तिला लग्नाचे आमिष दाखवून तिला हॉटेल साई निवारा येथे बोलविले. तेथे थंड पेयात गुंगीचे औषध टाकून  तिला बेशुध्द केल्यावर तिच्यावर बलात्कार करण्यात आला. तसेच तरुणीस अहमदाबाद येथे नेवून तेथे भाड्याच्या घरात ठेवण्यात आले. तेथेही तिच्यावर बलात्कार केला. याचबरोबर तिला जबरदस्तीने गर्भपाताच्या गोळ्या देण्यात आल्या.

यावेळी त्रास झाल्याने सदर तरुणीने तक्रार दिली असता तिला जातीवाचक शिवीगाळ करण्यात आली. त्यानंतर धुळे येथे सोडून देण्यात आले. याप्रकरणी पीडित युवतीने चाळीसगांव रोड पोलीस ठाणे गाठून फिर्याद दिल्याने बलात्कारासह अॅट्रासिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी लागलीच आरोपीला अटकही केली आहे. पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी दिनकर पिंगळे करीत आहेत.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने