जागतिक महिला दिन विविध कार्यक्रमांनी साजरा प्रभाकर आडगाळे मालपुर

 


मालपूर(प्रतिनिधी) जननी ... माता.... आई अशा अनेक बिरूदांनी ज्या मातांचे आपण गोडवे गातो पण पुरूष प्रधान संस्कृती विरूध्द त्यांना त्यांच्या हक्कांसाठी रस्त्यावर उतरून संघर्ष करावा लागतो तो दिवस म्हणजे ८ मार्च. भारतात मुंबई येथे पहिला महिला दिवस ८ मार्च १९४३ रोजी साजरा करण्यात आला. ८ मार्च १९७१ ला पुण्यात एक मोठा मोर्चा काढण्यात आला होता. पुढे १९७५ हे वर्ष युनोने `जागतिक महिला वर्ष' म्हणून जाहीर केले. त्यानंतर स्त्रियांच्या समस्या ठळकपणे समाजासमोर येत गेल्या. स्त्रियांच्या संघटनांना बळकटी आली. बदलत्या सामाजिक, आर्थिक, राजकीय, सांस्कृतिक परिस्थितीनुसार काही प्रश्नांचे स्वरूप बदलत गेले तशा स्त्री संघटनांच्या मागण्याही बदलत गेल्या. आता बँका, संस्था, महाविद्यालयांच्या कार्यालयांमधूनही ८ मार्च साजरा व्हायला लागला आहे. आजच्या काळात जागतिक महिला दिन सर्वत्र साजरा करताना दिसून येतो आहे.

या जागतिक महिला दिनाचे औचित्य साधुन अहिंसा पाॅलिटेक्निक महाविद्यालयाने 8 मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून साजरा केला. या कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्राचार्य आर. व्ही. पिंपळे यांनी फीत कापून उद्घाटन केले व विद्यार्थीनींनी स्वागत गीत सादर करुन कार्यक्रमाची सुरुवात केली. यावेळी महाविद्यालयातील महिला प्राध्यापक जे. आर. गिरासे, डी. बेडसे, एन.एन. पावरा, आर. एन. गिरासे, एस.एस. बाविस्कर, पूर्वा जैन, पी. बी. पुरी यांचे प्राचार्य आर. व्ही. पिंपळे, उपप्राचार्य तसेच मेकॅनिकल विभाग प्रमुख हालोरे, काॅम्प्युटर विभाग प्रमुख पारख, सिव्हील विभाग प्रमुख सामरे, ईले. अॅण्ड टेलिकम्युनिकेश विभाग प्रमुख भोई, प्रथमवर्ष विभाग प्रमुख पवार, ईलेक्ट्रिकलचे गोसावी, कार्यालयीन प्रमुख गीते यांनी महिला प्राध्यापकांना गुलाब पूष्प देऊन त्यांचा गौरव केला. या कार्यक्रमात अनेक विद्यार्थीनी जिजाऊ, सावित्रीबाई, कल्पना चावला यांच्या वेशभूषा सादर करून थोडक्यात विचार मांडले.
कार्यक्रम प्रसंगी प्राचार्य म्हणाले की, हा दिवस म्हणजे शिवबा घडविणार्या राजमाता जिजाऊ, लढवैय्या झाशीची राणी, भारतात दुष्काळात महाराष्ट्र, मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश, कर्नाटक अशा अनेक राज्यात त्यावेळी लाखो रुपये खर्च करुन पाण्याच्या विहीरी बांधुन समाजकार्य करणार्या राजमाता अहिल्यादेवी, स्वातंत्र्य लढ्यातील थोर कार्यकर्त्या सरोजिनी नायडू, भारतरत्न आणि नोबेल शांतता पुरस्कार सन्मानित एक भारतीय रोमन कॅथॉलिक नन मदर तेरेसा, राजकारणात प्रभावशाली व्यक्तीमत्व इंदिरा गांधी, गाणसम्राद्नी लता मंगेशकर, अनाथांची आई सिंधूताई सपकाळ, गगण भरारी सायंटिस्ट कल्पना चावला असे अनेक नावे सांगता येतील अशा सर्व थोर मातांचे विचार मांडून विद्यार्थी विद्यार्थीनींनी त्यांचे आचरण करुन त्यांनी केलेल्या कार्याचा बोध घ्यावा.  असे ते म्हणाले व सर्व महिला प्राध्यापक वर्ग, विद्यार्थीनींचे त्यांनी कौतुक केले.


 

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने