शिरपुरात आर.सी.पटेल कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात 44 विद्यार्थी कॅम्पस इंटरव्व्यूद्वारे निवड




शिरपूर : आर. सी. पटेल कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील ४४ विद्यार्थ्याची कॅम्पस मुलाखती द्वारे ‘बडोदा येथील टेली परफॉर्मन्स’ या कंपनीत १.९० वार्षिक वेतनावर निवड करण्यात आली.
आर.सी.पटेल शैक्षणिक संकुलाच्या महाविद्यालयातील अनेक विद्यार्थ्यांना यापूर्वी देखील कॅम्पसमुलाखती द्वारे नोकरी मिळाली आहे. महाविद्यालयातील अनेक विद्यार्थी विविध कंपन्यामध्ये उच्च पदावर कार्यरत असल्याची माहिती देण्यात आली.
महाविद्यालयातील कला, वाणिज्य, विज्ञान,आणि व्यवस्थापन शाखेतील विद्यार्थ्यासाठी कॅम्पस मुलाखत घेण्यात आली.ज्यात एकूण १२७ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. नोकरीसाठी ४४ विद्यार्थांची निवड झाली. यात व्यवस्थापन शाखेचे १४, विज्ञान शाखेचे १९, कला शाखेचे ४, वाणिज्य शाखेचे ७ अश्या ४४  विद्यार्थ्यांचा समावेश होता. कंपनीचे एच.आर. व्यवस्थापक गुरुश्रवन ठक्कर, एच.आर. पंकज गिरासे, एच.आर. एक्झीकेटीव स्वप्नील पाटील यांनी मुलाखती घेतल्या. त्यात महाविद्यालयातील अंतिम वर्षाचे विद्यार्थी पात्र होते. या प्रक्रियेत ऑफलाईन पद्धतीने तीन स्तर घेण्यात आले. अँपटीटयूड टेस्ट, ओपरेशनल राउंड आणि शेवटच्या एच. आर. राउंड घेण्यात आला. त्यात सुनैना चौधरी, निकिता जाधव, परदेशी रुचिता संतोषसिंग, वाडिले शितल कांतीलाल, जैन कुणाल लक्ष्मीकांत, निशा विलास भामरे, भाग्यश्री राजू सुतार, मिना किरण चौधरी, पुष्पेंद्र चौधरी, चव्हाण अक्षय सुदाम, पटेल कल्पेश वासुदेव, तेजस्विनी युवराज सनेर, मराठे नेहा नाथू, नेहा चंद्रकांत सोनार, धन्वंतरी संजय चौधरी, अजय जाधव, अक्षय कलाल, पुनम गिरासे, पाटील पवन, सीआर शुभम, भूपेंद्र पितोरभक्त, गांगुर्डे अजय कृष्णा, अमोल युवराज देवरे, बंजारा अत्तार सिंग, चेतना जगताप, समाधान गुलाब पाटील, कल्याणी विलास मराठे, वैष्णवी बारी,
अभिषेक पाटील, शुभम पवार, अर्जुन साहेबराव पाटील, पाटील रोहित कल्याण, रोहित धनसिंग गिरासे, सूर्यवंशी सुधीर भगवान, ठाकूर भाग्यश्री काशिनाथ, रोहित पवार, प्रियांका दिपक रणदिवे, माधुरी अशोक पाटील, चेतना गुलाब सोनवणे, पल्लवी पाटील, मानसी भावसार, रोशन पवार, तेजस डागा चौधरी, शिंदे आलोक रवींद्र इ. विद्यार्थ्यांची निवड झाली.

यशस्वी विद्यार्थ्यांचे माजी शिक्षण मंत्री अमरीशभाई पटेल, आर. सी. पटेल एज्युकेशनल ट्रस्टचे अध्यक्ष भूपेशभाई
पटेल, उद्योगपती चिंतनभाई पटेल, संस्था उपाध्यक्ष राजगोपाल भंडारी, सचिव प्रभाकरराव चव्हाण, माजी कुलगुरू डॉ. के.बी. पाटील, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी.आर. पाटील, उपप्राचार्य डॉ. ए. एम. पाटील, डॉ. आर. डी.जाधव, ट्रेनिंग प्लेसमेंट ऑफिसर सपना येशी, प्रा.बी.एस.पंचभाई यांनी कौतुक केले.

ट्रेनिंग प्लेसमेंट ऑफिसर सपना येशी, प्रा.बी.एस.पंचभाई यांनी कॅम्पस ड्राईव्ह चे आयोजन केले व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कॅम्पस ड्राईव संपन्न होण्यासाठी गणेश सोनार, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारीनी सहकार्य लाभले.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने