शिरपूर प्रतिनिधी - शिरपूर तालुक्यात मोठ्या प्रमाणावर उसाची लागवड होत असते मात्र शेत शहरातून जाणाऱ्या महावितरणच्या तारांमुळे होणाऱ्या शॉर्टसर्किटमुळे आग लागण्याच्या घटनेत सध्या वाढ होत असून शॉर्ट सर्किटमुळे ऊस जळून खाक झाले ची तालुक्यातील ही दुसरी घटना आहे दोन दिवसापूर्वी ठाणे शिवारात शॉर्टसर्किटमुळे आग लागून उसाच्या शेताचे फार मोठे नुकसान झाले होते अशीच घटना आज दिनांक एक मार्च रोजी समोर आले असून ालुक्यातील अजंदे शिवारात राजेंद्र गिरासे राहणार कळमसरे तालुका शिरपूर यांच्या शेतात शॉर्टसर्किटमुळे आग लागून त्यांच्या सहा एकर उसाच्या क्षेत्राचे नुकसान झाले आहे त्यांच्या शेजारील चार एकर व त्या शेजारील चार एकर अशा क्षेत्रांमध्ये आग लागल्याने सदरची आठ पसरत पसरत राजेंद्र गिरासे यांच्या शेतात येऊन त्यांच्या देखील सहा एकर ऊस जळून खाक झाला आहे घटनास्थळी अग्निशमन दलाच्या गाड्या पोहोचले असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम सुरू आहे दरम्यान वीज मंडळाच्या अधिकाऱ्यांनी सूचना देऊन देखील घटनास्थळी न पोहोचल्यामुळे शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे आणि सदर घटनेचा शासकीय पंचनामा करून नुकसानभरपाईची मागणी शेतकरी करत आहेत
Tags
news
