देवस्थान { शिरपूर } कुलदैवत श्री खंडेराव महाराज लेख- गावांकडची यात्रा ( सुनील शंकर सोनार )




देवस्थान { शिरपूर } कुलदैवत श्री खंडेराव महाराज

लेख- गावांकडची यात्रा
 ( सुनील शंकर सोनार )


शिरपूर शहरातील वैभव पुरातन व जागृत देवस्थान श्रीखंडेराव महाराज यांची यात्रा माघ पोर्णिमे पासून सुरुवात होते पुण्यश्लोक राजमाता अहिल्याबाई होळकर यांनी निर्माण केलेले हे प्राचीन पुरातन मंदिर महाराष्ट्रचे कुलदैवत समजले जाणारे हेच ते श्री खंडेराव मंदिर, शिरपूर शहराचे जागृत देवस्थान म्हणून प्रसिध्द आहे. या मंदिराबाबत आख्यायिका सांगितली जाते की, काळूबाबा नामक एक गृहस्त खंडोबा महाराज यांचे निस्सीम भक्त होते. ते हि संसारिक होते, त्यांना संतती न होती हिच त्यांची व्यथा, पण त्यांची खंडेराव महाराजांवर खूप श्रद्धा होती, त्यांना पुत्र प्राप्ती झाली ती महाराजांचा कृपेमुळे. काळूबाबा यांनी खंडेराव महाराजांना नवस बोललेला होता की, तुझ्या कृपेने जर मला पुत्र प्राप्ती झाली तर मी माझे शिरकमल तुला अर्पण करीन आणि खरोखरंच भगवंत काळू बाबा यांचा नवसाला पावले आता नवस फेडणे हे खुप अवघड होते, पण बोलल्या प्रमाणे त्यांनी भगवंताला आपले शीरकमल अर्पण करण्याची कबुली दिली होती. आता ती पूर्ण करण्याची वेळ आली आणि त्या ठिकाणी काय चमत्कार घडला; त्या शिरकमालातून रक्त न निघता भंडारा (हळद) निघू लागला. हि वार्ता पूर्ण गावात पसरली तेव्हा पासून शिरपूर या गावाचे नाव लौकिक झाले. अशी अख्यायिका या गावा बद्दल वयोवृद्ध लोकांकडून सांगितली जाते.

स्व, दौलत बाबा मोरे हे मंदिराची प्रथम पुजारी होते. आज पर्यंत त्यांची वंशपरंपरा चालू आहे समस्त मोरे कुटुंब या मंदिराची पूजा-अर्चा मनोभावे करीत असतात. तसेच खंडेराव महाराज ट्रस्ट हि मंदिराचा पूर्णपणे देखभाल करीत असते शिरपूर शहराचे भाग्यदाते आमदार अमरिशभाई पटेल,भूपेश भाईपटेल परिवार व खंडेराव विकास संस्थान मुळे यात्रेला सहकार्य लाभते . आजही ग्रामीण भागात यात्रेला खूप महत्व दिले जाते, कारण बाहेर गावी गेलेले भाविक यात्रेनिमित्त एकत्र येत असतात. आणि आनंद उत्सव साजरा करीत असतात. यात्रा म्हटली कि

आनंद उत्सव आला, लहान मुला सांठी तर पर्वणीच खेळणी, पाळणाघर, प्राण्याचे खेळ (सर्कस), रात्रीची विद्युत रोषणाई हि आकर्षण करणारी असते. वेगवेगळे मिळणारे खाद्यपदार्थ गुहउपयोगीवस्तू मंदिरपरिसरातील पूजा सामग्रीची दुकाने, हे हि एक आकर्षण असते. शिरपूर यात्रा उत्सव आज खानदेश मध्ये परिचित आहे. घोडे बाजार हा हि केंद्रबिंदू मानला जातो. परराज्यातून घोडे खरीदी करण्यासाठी लोकं यात्रेत येत असतात. आणि घोडे खरीदी करीत असतात.

आज शिरपूर शहरातील सर्व सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक धार्मिक संस्था या कार्यात अग्रेसर असतात. शिरपूर वरवाडे नगर पालिका, सफाई कर्मचारी, पोलीस कर्मचारी तसेच सामाजिक संस्था हि या यात्रे उत्सव दरम्यान मदतनिस बनून सेवा देत असतात. भाविक यात्रे दरम्यान यथासांग खंडेराव महाराज यांचे दर्शन घेऊन स्वताला धन्य मानतात व आपला नवस मनोभावे पूर्ण करीत असतात.

एकात्मताचे दर्शन आज ग्रामीण यात्रे उत्सव दरम्यान पाहायला मिळते. म्हणून ग्रामीण भागातील यात्रेला महत्व दिले जाते हे तेवढेच खरे आहे. परंतु कोविड (१९) व ओमिक्रोम सारख्या महामारीमुळे यात्रा हि जरी रद्ध झाली असली तरी, भाविक गण कुलदैवत श्री खंडेराव महाराज यांचे दर्शनासाठी येत असतात व आपले नवस यथा सांग पूर्ण करीत असतात. परंतू भाविकांनी दर्शन रांगेत घेऊन अंतर ठेवणे गरजेचे आहे तसेच मास्क हि लावणे आवश्यक आहे. मंदिर परिसर मध्ये सीसी टीवी बसविले असल्या कारणाने श्री खंडेरायमहाराज यांचे दर्शन देखील आपण दर्शन रांगेतून घेऊ शकतो.

नगरपालिका व संस्थानचा वतीने जनजागृती केली जाते, कोविड नियम व उपचार असेवेगवेगळे फलक संस्थे मार्फत लावले गेलेले असतात. प्रथमोपचार व पोलीस मदत केंद्र देखील या यात्रे दरम्यान आपणास मदतनीस म्हणून सेवा देत असतात. अश्याप्रकारे शिरपूर येथील यात्रा म्हणजे एक पर्वणीच असते.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने