ईश्वर बोरसेंवर हल्ला करणाऱ्याला निलंबित करा प्रहार अपंग क्रांती संस्थेची मागणी




  शिरपूर येथील वृत्तपत्राचे संपादक व पत्रकार ईश्वर बोरसे यांच्यावर शिरपूर पंचायत समितीचे कर्मचारी दिग्विजय ठाकरे यांनी दिनांक १७ जानेवारी रोजी हमला केला होता. बोरसे यांना मारहाण केली होती.त्यामुळे या दिग्विजय ठाकरे यांना निलंबित करण्याची मागणी प्रहार अपंग क्रांती संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी ग्रामीण विकास यंत्रणेचे जिल्हा प्रकल्प संचालकांकडे केली.
    दिनांक १७ जानेवारी रोजी संपादक व पत्रकार ईश्वर बोरसे यांच्यावर पंचायत समितीचे कंत्राटी कामगार दिग्विजय ठाकरे व त्यांच्या साथीदारांनी हमला केला होता. बोरसे यांना जबर मारहाण करण्यात आली होती. यात बोरसे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती.या प्रकरणी ठाकरे याला निलंबित करावे अशी मागणी धुळे येथील प्रहार अपंग क्रांती संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे. 
     लोकशाही चा चौथा स्तंभ पत्रकाराला मारहाण करूनही आरोपी १५ दिवसांपासून बिनधास्त फिरत आहे.प्रशासन त्याच्यावर कारवाई करीत नाही.सदर हल्लेखोराला  पंधरा दिवसांत निलंबित न केल्यास प्रहार अपंग क्रांती संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.
     निवेदन देतांना कविता पवार,इंदूताई विजय क्षिरसागर, शशिकांत सूर्यवंशी, रामलाल जैन,संजय सोनवणे, संजय सरग, शितल चव्हाण, सरला सुर्यवंशी, सुनिल घटी मुस्ताफ शेख,  दिलीप दगड़े आदी निवेदन देते वेळी उपस्थित होते.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने