शिरपूर तालुक्यातील थाळनेर हे लता मंगेशकराचे आजोळ बालपणाच्या काही काळ त्यांनी थाळनेर मध्ये घालवला





शिरपूर - आज देशातील सुप्रसिद्ध  गायिका लता मंगेशकर यांचे वयाच्या 92 व्या वर्षी अल्पशा आजाराने निधन झाले लता मंगेशकर संपूर्ण भारत देशाच्या स्वाभिमान होत्या व त्यांना देशाची गानकोकिळा म्हणून बहुमान प्राप्त होता. लता मंगेशकर यांच्या शिरपूर तालुक्यातील थाळनेर या गावाशी अगदी जवळून संबंध होता व त्यांचे आजोळ थाळनेर असल्याने बालपणाच्या काही काळ त्यांनी थाळनेर येथे घालवला होता. याबाबत बोलताना स्वतःला लता मंगेशकर यांनी याविषयी मनोगत व्यक्त केले होते नंतरच्या काळात त्यांचे बंधू हृदयनाथ मंगेशकर यांनी दोन वेळा थाळनेर गावी भेट दिली होती.
धुळे जिल्हयातील शिरपूर तालुकयातील थाळनेर हे लता मंगेशकराचे आजोळ आहे. लता दिदीचा जन्म मध्यप्रदेशातील इंदौर २८ सप्टेंबर १९२७ रोजी येथे झाला असला तरी त्यांचे बालपण थाळनेर येथेच गेले आहे. १जून १९३२ रोजी थाळनेरमधील जिल्हा परिषद शाळा क्रमांक १ मध्ये त्यांची शिक्षणाची सुरुवात झाली. १९३७ पर्यत त्या ५-६ वी चे शिक्षण घेऊन १९४२ ला कोल्हापूर येथे गेल्यात. त्यानंतर मात्र त्या पुन्हा थाळनेरला आल्याच नाहीत. थाळनेर गावात लता मंगेशकराच्या आई माई मंगेशकर यांच्या स्मृतीनिमित्त खंडेराव महाराजांचे मंदिर बांधण्यात आले आहे. ते आजही आहे. थाळनेर गावात आजही लता दिदीच्या बालपणाच्या आठवणी आहेत. त्यांच्यासह चार बहीणी वडीलांच्या नाटक कंपनीला मदत करत असे. थाळनेरला १८ एकर शेत, घर आहे. थाळनेरचे जमादार यांच्यासाठी एक गाणे देखील लता दिदीनी गायले आहे. मध्यतरी १९९५-९६ ला जळगाव येथे गाण्याच्या कार्यक्रमांनिमित्त हदयनाथ मंगेशकर आले असता त्यावेळी त्यांनी थाळनेरला भेट दिली होती. त्यानंतर मात्र कोणीही आले नाही.

 दरम्यान थाळनेर करांनी लता दिदीकडे संगीत विदयालयाची मागणी केली होती परंतु त्याबाबत आश्वासन देण्यात आले होते मात्र काही कारणास्तव ते पूर्ण झाले नाही . मागील अनेक वर्षात मंगेशकर परिवारातील ोणीही ठरणार्‍या गावी यांनी भेट दिली नसली तरी लतादीदींच्या जुन्या आठवणी या गावाशी जोडले असल्याने थाळनेर गावाला आज देखील लतादीदींच्या आठवणी ताज्या असून  या गावाशी लतादीदींचे नाव सोडले गेले याबाबत त्यांना अभिमान वाटत असतो.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने