लय हुशारी केली पण कामी नाही आली; कॅश भरण्यासाठी आलेल्या इसमाने आणल्या नकली नोटा, कॅशयर च्या हुशारी मूळे फुटले बिंग, मलकापुरातील घटना मलकापूर:- उमेश ईटणारे




 एचडीएफसी बँकेचे कॅशीयर वैभव रमेश देशमुख वय 30 वर्ष यांनी पोलीस स्टेशनला येवुन माहिती दिली की , दिनांक 21/02/2022 रोजी दुपारी 2.30 वा दरम्यान इरफान हनीफभाई पटनी मुळ रा. सुमरा सोसायटी रामनगर , गोंदल राजकोट गुजरात सद्या वडनेर भोलजी हा इसम एचडीएफसी बँक शाखा मलकापुर येथे कॅश भरणा करण्यासाठी गेला व बोहरा इंडस्ट्रीयल ऑईलचे अकाउंटवर भरणा करण्यासाठी स्लिप भरुन रक्कम कॅशीयरकडे दिली. कॅशीयरने नोट सॉरटींग मशीन मध्ये सदर इसमाने दिलेल्या 2000 , 500,200 व 100 रुपये दराच्या नोटा काउंट करीत असतांना 500 रुपये दराच्या नोटापैकी 38 नोटा रिजेक्ट बॉक्समध्ये आल्याने सदर नोटा त्यांनी चेक केल्या असता त्याची पेपर कॉलीटी खराब, हलक्या दर्जाची व नोटामधील आरबीयआयचा सिंबाल असलेला तार दिसुन आला नाही. सदर नोटा नकली असल्याबाबत कॅशीयरने इरफान पटनी यास सांगुन त्या कोठुन आणल्या असे विचारले असता त्याने माझा पार्टनर शेख वसीम शेख सलीम आम्ही सोबत काम करतो, तुम्ही मला त्या नोटा परत दया मी त्या बदलुन आणतो असे म्हणाला परंतु कॅशीयरने त्यास बनावट नोटा परत देता येत नाही, पोलीस स्टेशनला एफआयआर होईल असे सांगीतले. त्यानंतर कॅशीयर वैभव रमेश देशमुख यांनी आज रोजी पोलीस स्टेशनला येवुन इरफान हनीफभाई पटनी मुळ रा.सुमरा सोसायटी रामनगर , गोंदल राजकोट गुजरात ह.मु. वडनेर भोलजी व बोहरा इंडस्ट्रीयल ऑईलचे अकाउंटधारक शेख वसीम शेख सलीम रा. नुरानी मस्जीद , सजनपुरी , खामगाव यांनी 500 रुपये दराच्या बनावट 38 नोटा एकुण 19,000 रुपये मुल्याच्या खऱ्या म्हणुन जवळ बाळगुन एचडीएफसी बँके मलकापुर शाखेत भरणा केल्यामुळे त्यांचेविरुध्द कलम 489 ( ब ). ( क ) भा.द.वि.प्रमाणे कायदेशिर कार्यवाही होणेसाठी फिर्याद दिली आहे. सदर फिर्यादवरुन पो.स्टे . मलकापुर शहर येथे अप.नं. 90/2022 कलम 489 ( ब ) ( क ) भा.द.वि. प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे. गुन्हयातील आरोपींना ताब्यात घेण्यात आले असुन सदर गुन्हयाचा तपास सपोनि स्मिता म्हसाये करीत आहे.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने