गृहनिर्माण आणि गृहतारण संस्थांच्या उभारणीसाठी निधी उपलब्ध करून देणार



मुंबई(खास )- राज्यातील गृहनिर्माण आणि गृहतारण  संस्थांच्या उभारणीसाठी आवश्यक असणारा साधारणतः ५०० कोटींचा निधी राज्य सरकारच्या हमीवर विविध वित्तीय संस्थांकडून उपलब्ध करुन देण्यात येईल. अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा महाविकास आघाडीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी दिली. महाराष्ट्र स्टेट को ऑपरेटीव्ह हाऊसिंग फायनान्स कार्पोरेशन संचालकांनी मागणी केली असता त्यांनी निधी उपलब्ध करुन देण्याचे आश्वासन दिले.
महाराष्ट्र स्टेट को ऑपरेटीव्ह हाऊसिंग फायनान्स  कार्पोरेशन चेअरमन व्ही.बी. पाटील,व्हा.चेअरमन सुनिल जाधव, संचालक माजी मंत्री डॉ.सतीश पाटील, तज्ञ संचालक प्रा.ए.बी.पाटील आणि संचालक मंडळाने यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठाणमध्ये शरद पवार यांची भेट घेतली असता ५०० कोटी निधीची मागणी केली.
राज्यामध्ये जिल्ह्याच्या आणि तालुका पातळीवर मोठ्या प्रमाणात गृहनिर्माण आणि गृहतारण संस्थानची आवश्यकता भासत आहे. अर्थपुरवठ्या अभावी अनेकांना स्वमालकीची घरे नसल्यामुळे वंचीत रहावे लागत आहे. हाऊसिंग फायनान्सच्या माध्यमातून अल्पदरात कर्ज पुरवठा होत असल्याने लोकांचा कल हाऊसिंग  फायनान्सकडे असतो. या सर्व गोष्टींचा अभ्यास करून हाऊसिंग  फायनान्सच्या दरावरुन संपूर्ण राज्यातील जिल्हा निहाय आवश्यक निधीचा आढावा घेवून तसा प्रस्ताव राज्य शासनाकडे सादर करावा.याबाबत राज्यातील वित्तीय संस्थांकडून आपण सरकारच्या हमीवर निधी उपलब्ध करुन देवू हौसिंग फायनान्सच्या  स्तावर मालमत्तेबाबतही अहवाल सादर केल्यास मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करुन देण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री वित्तीय संस्थांचे प्रमुख यांच्याशी आपण सविस्तर चर्चा करु आणि तात्काळ निधी  उपलब्ध करुन देवू असेही शरद  पवार यावेळी म्हणाले.



Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने