गॅस सिलेंडरचा भीषण स्फोट दोन जण गंभीर जखमी डोणगाव येथील घटना मलकापूर - उमेश ईटनारे




: गॅस वेल्डिंगच्या दुकानातील गॅस सिलिंडरचा स्फोट झाल्याने दोन जण गंभीर जखमी झाले . डोणगाव ( ता . मेहकर ) येथील राज्य महामार्गावरील दुकानात आज , ३ फेब्रुवारी रोजी दुपारी दोनच्या सुमारास ही घटना घडली . स्फोट एवढा भीषण होता की शटर व लोखंडी वस्तू पाचशे फुटांच्या वर हवेत उडाल्या होत्या .

प्रत्यक्षदर्शीनी दिलेल्या माहितीनुसार , डोणगाव येथील गजानन यादवराव विढोळे यांच्या राज्य महामार्गावरील ग्रामपंचायत कॉम्प्लेक्सला लागून असलेल्या दुकानात गॅस लीक झाल्याने धूर निघत होता . दुकान बंद होते . त्यामुळे आजूबाजूला लोकांनी गर्दी केली होती . धुराचे रूपांतर आगीत झाल्याने वेल्डिंगच्या दुकानाच्या बाजूला असलेले दुकानमालक सलीम खाँ ताज खाँ ( ५० ) व त्यांचा मुलगा कासिफ खाँ ( २२ ) हे दोघे आग विझविण्याचा प्रयत्न करू लागले . मात्र तेवढ्यात दुकानातील सिलिंडरचा स्फोट झाल्याने दोघे गंभीर जखमी झाले . त्यांना तातडीने मेहकर येथील रुग्णालयात हलविण्यात आले . मेहकर येथून अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आल्यानंतर आग नियंत्रणात आणण्यात आली . पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून राज्य महामार्गावरील वाहतूक सुरळीत केली . वृत्त लिहीपर्यंत पंचनाम्याची प्रकिया सुरू होती .

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने