(शिरपूर प्रतिनिधी) तालुक्यातील बोरगाव येथे कै. नथूसिंहजी महाराज यांच्या आशिर्वादाने व हभप कृष्णाजी महाराज चाळीसगावकर यांच्या मार्गदर्शनाने मागील १० वर्षांपासून अखंड हरीनाम कीर्तन सप्ताहाचे आयोजन करण्यात येत आहे. सालाबादाप्रमाणे यंदाही दि. १४ ते २१ फेब्रुवारी २०२२ दरम्यान सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. त्या निमित्याने गावात मोठ्या जल्लोषात पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. दि २१.०२.२०२२ रोजी सप्ताहाचा समारोप हभप किशोर महाराज धुळेकर यांच्या काल्याचे कीर्तनाने करण्यात आला व सप्ताह समारोप निमित्त परिसरातील भाविकांसाठी महाप्रसादचा भंडारा ठेवण्यात आला होता.
दरवर्षी अश्या प्रकारे कीर्तन सोहळा आयोजित होत असल्याकारणाने गावातील वातावरण भक्तिमय होत असते. गावातील ग्रामस्थ सकाळी लवकर उठून काकडा आरतीत सहभागी होतात. ७ दिवसा पासून अखंड चालण्याऱ्या ह्या कीर्तन सोहळ्यात रोज रात्री कीर्तनकार महाराजांकडून व्यसनमुक्ती, शिक्षण, आई वडिलांची सेवा अश्या विविध विषयावर सकारात्मक विचारांचे कीर्तने होत होती ज्या मुळे ग्रामस्थांवर निश्चितच त्याचा चांगला परिणाम होणार आहे.
कीर्तन सप्ताहात अनुक्रमे हभप ज्ञानेश्वर महाराज सुरत, हभप पांडुरंग महाराज ठाकरे, हभप मनिषाताई राठोड मोरदडकर, हभप सदानंद महाराज धामणगाव, हभप ज्ञानेश्वर राजपूत महाराज कढरेकर, हभप ज्ञानेश्वर महाराज वरझडीकर व हभप किशोर महाराज धुळेकर यांची कीर्तने झाली. तसेच कीर्तन सेवेचे मानकरी अनुक्रमे देवेंद्रसिंग दगेसिंग राजपूत, योगेंद्रसिंग दाजभाऊ सिसोदिया, रमेश काशिनाथ जोशी, राहुल अमरसिंग राजपूत, नारायण लकडू राजपूत, भटेसिंग पौलात राजपूत, रामकृष्ण विठोबा राजपूत, दगडू पोपट पाटील व महाप्रसादाचे मानकरी झिंगा लकडू राजपूत होते.
*हरीनाम सप्ताह समारोपाच्या दिवशी महादेव मंदिर बांधकामासाठी अहोरात्र मेहनत घेणाऱ्या आनंदा मिस्त्री, वसंत कोळी, रोहिदास भिल, प्रविण राजपूत तसेच दरवर्षी कीर्तन सप्ताह्यास मदत करणारे शिरपूर येथील गोयल ट्रेडिंग कंपनी चे मालक कीर्तीकुमार अग्रवाल यांचा सत्कार माजी सैनिक दगेसिंग राजपूत यांच्या हस्ते करण्यात आला.* हरीनाम सप्ताहासाठी हभप निवृत्ती महाराज आळदीकर, पांडुरंग महाराज, विणेकरी म्हणून हभप जालिंदर न्हावी, प्रकाश पाटील हिंगोणीकर यांची मदत लाभली तसेच परीसरातील जातोडा, हिंगोणी, बाळदे, वनावल, रुदावली, साकवद, उप्परपिंड येथील भजनी मंडळीचे सहकार्य लाभले.
कीर्तनाचा सोहळा यशस्वी करण्यासाठी माजी सैनिक दगेसिंग मोहनसिंग राजपूत, प्रकाश राजाराम न्हावी, विठ्ठल झुलाल कोळी, निवृत्त पो. पा. जयसिंग राजपूत, माजी सरपंच रघुनाथ कोळी, उपसरपंच योगेंद्रसिंग सिसोदिया, जयराम पोपट पाटील, नारायण लकडू राजपूत, योगेंद्र दगेसिंग राजपूत, सागर कोळी, प्रविण राजपूत, अनिल पाटील, भटेसिंग पौलाद राजपूत, सोसायटी चेअरमन खंडू राजपूत, सुभाष न्हावी, दीपक पदमसिंग राजपूत, पोलीस पाटील मनोहर पाटील, गुलाब फुला भिल, भाईदास न्हावी, आनंदसिंग राजपूत गावातील युवक तरुणांनी मोलाचे सहकार्य लाभले.
Tags
news
