नामांकित कंपनीची केबल भर रस्त्यात बेवारस पडून; मोठा अपघात झाल्यास जवाबदार कोण ? नागरिकां मध्ये चर्चा मलकापूर - उमेश ईटणारे




मलकापूर शहरात मुख्य रहदारीच्या रस्त्यावर एका नामांकित कंपनीचे केबल भर रस्त्यात पडून आहेत. याबाबत सविस्तर वृत्त असे की मलकापूर शहरातील मुख्य रस्त्यावर एका नामांकित कंपनीचे केबल पडून असून मोठा अपघात होण्याची संभावना नाकारता येत नाही.
  सदर रस्त्यावर येणाऱ्या जाणाऱ्या तसेच मोठे वाहन आणि दुचाकी रिक्षा इत्यादी वाहनांची येणे जाणे सुरू असते व या रस्त्यावरून काही शाळेतील व महाविद्यालयीन विद्यार्थी व वृद्ध नागरिक रस्त्याने ये-जा करीत असतात या केबलला वाचविण्याकरिता  इकडून तिकडे वाहन चालवत असतात. सदर केबलच्या कंपनीने व संबंधित अधिकाऱ्यानी या केबलची व्यवस्था करावी अशी नागरिकांमध्ये चर्चा आहे.  ही केबल बेवारस स्थितीत पडलेली असून याकडे संबंधित अधिकारी लक्ष देतील काय असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. या केबलमुळे मोठा अपघात होऊ शकतो असे नागरिकांमध्ये चर्चा आहे. स्थानिक नागरिकांची प्रतिक्रिया प्रस्तुत प्रतिनिधीने जाणून घेतली असता  नागरिकांनी सांगितले या केबलमुळे अपघात झाल्यास जबाबदार कोण राहणार असा प्रश्न ये-जा करणाऱ्या नागरिकांना पडला आहे.  सदर केबल ताबडतोब हटविण्यात यावी अशी प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केली आहे.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने