आठवणीतील गानसम्राज्ञी-भारतरत्न





आठवणीतील गानसम्राज्ञी-भारतरत्न
        स्व. ( लता दिनानाथ मंगेशकर. ) 
लेख- गावाकडील आजोळ, (थाळनेर) 
थाळनेर ता.(  शिरपूर ) येथील आजोळ असणाऱ्या लता मंगेशकर यांचे आज  रविवार दिं-(5/2/2022) सकाळी मुंबई येथे निधन झाले . 
आई स्व, माई मंगेशकर थाळनेर येथील रहिवासी होते. त्यांच्या आई माई मंगेशकर यांचे गाव थाळनेर  असल्याने ते नेहमी आपल्या गावाचे नाव घेत असत .वडील स्व .दिनानाथ मंगेशकर स्व.लता मंगेशकर यांचे वडील होते. लता मंगेशकर ,आशा मंगेशकर (भोसले) उषा मंगेशकर ,मीना मंगेशकर (खडिकर)अशा चार बहिणी होत ,आणि एक भाऊ श्री ह्दयनाथ दिनानाथ मंगेशकर होते.कालातरांने ते (मुंबई) येथे स्थायिक झाले. मुबंई त्यांची कर्मभूमी झाली .आपल्या मधुर आवाजां मुळे त्यांना आज भारताची गान कोकिळा हि पदवी मिळाली.त्यानां मानाचा व प्रतिष्ठेचा भारतरत्न पुरस्कार  सरकार कडून बहाल करण्यात आला. अशा या महान गानसम्राज्ञी बद्दल लिहावे तेवढे कमीच आहे. 
मराठी, हिंदी चित्रपट सृष्टीतील अनेक चित्रपट, दिग्गज कलाकारांच्या गायनात स्व, लता मंगेशकर यांनी आवाज दिला आहे. (हे मेरे वतन के लोगो,) या राष्ट्रीय गायनाने अक्षरश: रडवून देणारा हा आवाज आज हरपून गेला आहे. लहानपणा तील  थाळनेर या गावा विषयी असलेल्या आठवणी आज पर्यंत त्यांनी मुलाखत मध्ये देतांना आपण ऐकले व पाहिले असेल. आपल्या थाळनेर या आजोळ असणाऱ्या गावात त्यांनी मराठी शाळेत शिक्षण घेतले, लता दीदी यांचा आवाजात साक्षात सरस्वती देवीचा वास होता असे म्हटले जाते. हे तेवढे च खरे आहे. आज सकाळी मी लता मंगेशकर यांच्या आजोळ असणाऱ्या थाळनेर या गावातील त्यांच्या आठवणीतील घर या ठिकाणी श्रद्धांजली अर्पण केले व आठवणीतील लता मंगेशकर या विषयावर लेख लिहून ते सादरीकरण केले. लिहिण्यासाठी शब्द अपुरे   पडतील येवढे त्यांनी केलेले कार्य आहे. आज ते आपल्यालात नाही यांची उणीव आहे. परमेश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती प्रधान करो हि प्रार्थना भावपूर्ण श्रद्धांजली स्व, लता दीदी मंगेशकर.  
🙏😭💐
संग्रहित फोटो  -(  सुनील शंकर सोनार, शिरपूर  )

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने