वीर जवान शहीद संजयसिह राजपूत यांच्या तृतीय पुण्यतिथी निमित्त श्रीमद्द भागवत कथेचे आयोजन मलकापूर - उमेश ईटणारे




 काश्मिरमधील पुलवामा येथे झालेल्या भ्याड हल्ल्यात शहीद मलकापूर येथील वीर जवान शहीद संजयसिंह राजपूत यांच्या तृतीय पुण्यतिथी निमित्त ७ ते १४ फेब्रुवारीपर्यंत श्रीमद् भागवत कथा व भव्य अखंड हरीनाम सप्ताहाचे आयोजन विवेकानंद आश्रम , माता महाकाली नगर मलकापूर येथे करण्यात आले संकिर्तन स्वामी आहे . या आयोजित करण्यात आलेल्या सप्ताहामध्ये ह . भ . प . परम्श्रध्देय युवराज श्रीजी महाराज पांडुरना जि . छिंदवाडा ( मध्यप्रदेश ) हे कथेचे वाचन करणार आहेत . त्याचप्रमाणे ह.भ.प. गजानन महाराज वरसाडेकर जळगाव खा . , ह . भ . प . अक्रुर महाराज साखरे गेवराई बीड , ह.भ.प.सोपान महाराज शास्त्री सानप हिंगोली , ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज पाटील जळकेकर , रामायणाचार्य ह.भ.प. विदर्भरत्न जळगाव संजय महाराज पाचपोर , भागवताचार्य ह . भ . प . महंत समाधानमहाराज भोजेकर जळगाव खा . , ह.भ.प. आचार्य अमृताश्रम स्वामी महाराज बीड यांचे किर्तन तर १४फेब्रुवारी रोजी सकाळी १० ते १२ ह.भ.प.महंत नितीनदास महाराज मलकापूर यांचे काल्याचे किर्तन होणार आहे .

८ फेब्रुवारी ते १३ फेब्रुवारी पर्यंत युवकांसाठी शहीद संजयसिंह राजपूत स्मृती व्याख्यानमालेचे सकाळी ९ ते ११ आयोजन केले असून यामध्ये युवकांना व्याख्याते मार्गदर्शन करणार आहेत . तसेच ९ , ११ व १३ फेब्रुवारी रोजी मोफत रुग्ण तपासणी व रोगनिदान शिबिराचे आयोजन सकाळी १० ते १ वा . पर्यंत करण्यात आले आहे . कोरोनाच्या पार्श्वभूमिवर शासनाने दिलेल्या नियमांचे पालन करून या सर्व कार्यक्रमांचे लाईव्ह प्रक्षेपण युट्यूब चॅनल शहीद संजयसिंह राजपूत या नावाने पाहता येईल . त्यामुळे जास्त गर्दी न करता याचा लाभ घ्यावा , असे आवाहन आयोजक शहीद संजयसिंह राजपूत परिवार व माता महाकाली नगर मित्र मंडळ यांनी केले आहे .

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने