महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियान (VSTF) व शिक्षण विभाग, जिल्हा परिषद, धुळे यांच्या संयुक्त विद्यमानेज्ञानज्योतीसावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्तने शाळांमध्ये साहित्य वाटप* दोडाईच( अख्तर शाह)




सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीदिनानिमित्त“ज्ञानोत्सव्– २०२२” अंतर्गत शाळांना देण्यात आलेल्या निधीच्या माध्यमातून खरेदी करण्यात आलेल्या वस्तूंचे (संगणक, टॅब, शालेय व वाचनालय साहित्य) वाटप कार्यक्रम मा.उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रा.पं.), व मा.  शिक्षणाधिकारी (प्रा.)  जिल्हा परिषद,धुळे  यांचे हस्ते संपन्न झाला .
शाश्वतविकासाचेध्येय (Sustainable Development Goals) ठेऊन राज्यातील १००० गावांचे परिवर्तन घडवून आणण्यासाठी राज्य शासनाने विविध शासकीय योजनांचा कृतिसंगम व खाजगी वित्तीय संस्थांच्या कंपनी सामाजिक दायित्वाच्या (CSR) माध्यमातून अत्यंत महत्वाकांक्षी असलेले महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियान दिनांक ०१ मार्च २०१७ च्या शासन निर्णया नुसार सुरू केले आहे.
ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानची धुळे जिल्ह्यात जानेवारी २०१९ पासून अंमलबजावणीला सुरुवात करण्यात आली आहे. अभियानामध्ये एकूण १६  ग्रामपंचायतीचा समावेश करण्यात आला आहे. 
ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानाद्वारे प्रति ग्रामपंचायत 04 लक्षप्रमाणे 1६ ग्रामपंचायत प्राप्त ग्रामकोषनिधी रक्कम रुपये. ६४ लक्ष पैकी आज पावेतो रक्कम रुपये ५३.२० लक्ष निधी खर्च झालेला आहे. या मध्ये गावाच्या गरजे नुसार विविध कामे करण्यात आली आहेत ज्या कामांना कोणत्याही योजनेतून निधी प्राप्त होऊ शकत नव्हता, यामध्ये विशेषतःशाळा, अंगणवाडी रंगरंगोटी, डिजिटल शाळा करीता उपयुक्त प्रोजेक्टर, कॉम्पुटर, प्रिंटर, शाळा करिता सोलर सिस्टीम, हॅन्ड वॉश स्टेशन, अंगणवाडी करिता लहान मुलांना बसण्यास उपयुक्त टेबल व खुर्ची. अश्या अनेक बाबी ग्रामकोष निधीच्या माध्यमातुन उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
“ज्ञानज्योतिसावित्रीबाई फुले गुणवत्तापुर्ण शिक्षण अभियान
व्हि एस टी एफ मार्फत दिनांक 29 फेब्रुवारी, 2020 रोजी “ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले गुणवत्तापूर्ण शिक्षण अभियानाची” सुरूवात केली आहे. ग्रामीण भागातील मुलांना गुणवतापूर्ण शिक्षण मिळविण्यासाठी “ज्ञानज्योतिसावित्रीबाई फुले गुणवत्तापुर्ण शिक्षण अभियान राबविण्याची सुरवात जिल्ह्यातील महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तनअभियानात समाविष्ट गावातील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक व उच्च प्राथमिक उत्कृष्ट खालील तीन शाळांची राज्य पातळीवरील सुचनांच्या व परिपत्रकातील नमूद निकषाच्या आधारे निवड करण्यात आली आहे. 
१. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, रामी , ता. धुळे.  
२. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, खोरदड, ता. धुळे.
३. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, नंदाळे (बु.) , ता. धुळे. 

सर्व मुलांनागुणवत्तापुर्ण शिक्षणासाठी शिक्षकांची क्षमता बांधणी व आधुनिक तंत्रज्ञानाच्या सुविधा देणे, मूलभूत सोयी- सुविधा देणे, शाळा व्यवस्थापन समितीचे सक्षमीकरण व लोकसहभागातून गावात शैक्षणिक वातावरण निर्माण करणे,  मुलांच्या सुदृढ आरोग्यासाठी शाळा तिथे पोषण परसबाग विकसित करणे आणि आनंददायी शिक्षणाच्या माध्यमातून जिल्ह्यातील १० मेंटॉर्स विद्यार्थी तयार करण्यासाठी निवड करण्यात आलेल्या शाळेचे आदर्श शाळा विकास आराखडा व निधी मागणी पत्र राज्य स्तरावर सादर करण्यात आले होते व त्यास राज्य कार्यालय, महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तनअभियान द्वारे आराखड्यास मान्यता देण्यात आली असून मंजूर निधी संबंधित शाळेच्या शाळा व्यवस्थापन समितीच्या खात्यावर वर्ग करण्यात आलेला आहे.
अ. क्र. तालुका ग्रामपंचायत शाळेचे नाव निधीचा स्त्रोत प्राप्त निधीची रक्कम(रु.)
धुळे रामी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, गोरेवाडी, ता. धुळे. महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तनअभियान २,८०,०००/-
धुळे खोरदड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, खोरदड ३,००,००० /-
धुळे नंदाळे (बु.) जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, नंदाळे (बु.) २,९५,०००/-
८,७५,०००/-
“ज्ञानज्योति सावित्रीबाई फुले गुणवत्तापुर्ण शिक्षण अभियान समाविष्ट शाळेमध्ये "लोकसहभागातून" वृक्ष लागवड शाळा भिंत  बांधण्यात आली, पालकांच्या मदतीने खड्डे खोदकाम, शाळामध्ये फरशी बसविणे, काम किचन शेड दुरूस्ती इ. कामेकरण्यात आलेली आहेत. 
महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियान (VSTF)  व शिक्षण विभाग, जिल्हा परिषद, धुळे  यांच्या संयुक्त विद्यमानेज्ञानज्योतीसावित्रीबाई फुले यांच्या दि. ०३ जानेवारी, २०२२ रोजीच्या जयंती दिनानिमित्त “ज्ञानोत्सव्– २०२२” अंतर्गत “ज्ञानज्योतिसावित्रीबाई फुले गुणवत्तापुर्ण शिक्षण अभियान समाविष्ट शाळांना देण्यात आलेल्या निधीच्या माध्यमातून खरेदी करण्यात आलेल्या वस्तूंचे (संगणक, टॅब, शालेय,वाचनालय व क्रीडा साहित्य) वाटप मा.उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रा.पं.), व मा.  शिक्षणाधिकारी (प्रा.)  जिल्हा परिषद,धुळे  यांचे हस्ते करण्यात आले.  यावेळी खोरदड रामी नंदाळे बु. येथील सरपंच शालेय शिक्षण समिती अध्यक्ष सचिव व निवडण्यात आलेल्या शाळेचे मुख्याध्यापक व सहाय्यक शिक्षक आणि जिल्हा परिषद ग्रामपंचायत विभागाचे सहाय्यक गट विकास अधिकारी प्रकाश महाले व ग्राम विकास अधिकारी श्री मोतीलाल कुवर,  श्री विशाल नागनाथवार, जिल्हा कार्यकारी अधिकारी, महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियान (VSTF),  श्री योगेश सुरेश तूरे तालुका समन्वयक महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियान (VSTF)  हे उपस्थित होते.  
सदरील कार्यक्रमास संबंधित गावातील सरपंच, आदर्श शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व सदस्य यांना शाळांना देण्यात आलेल्या निधीच्या माध्यमातून खरेदी करण्यात आलेल्या ०४  संगणक, १०  टॅब,  इ  शालेय वस्तूंचे वाटप करण्यात आले.  कार्यक्रमाचे प्रस्ताविक श्री. विशाल नागनाथवार जिल्हा कार्यकारी अधिकारी, महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियान (VSTF), यांनी केले तर आभार प्रदर्शन श्री योगेश तूरे तालुका समन्वयक महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियान (VSTF) यांनी केले.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने