*डॉ.दिनेश भक्कड यांचे दोन पुस्‍तकांचे विमोचन*




शिरपूर, किसान विद्या प्रसारक संस्था संचलित एसपीडीएम कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय येथील सहयोगी प्राध्यापक डॉ.दिनेश भक्कड यांच्या व्यूहरचनात्मक व्यवस्थापन आणि संशोधन पद्धती या दोन पुस्तकांचे विमोचन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.व्हि.एम.पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी उपप्राचार्य प्रा.पी.जी.पारधी, उपप्राचार्य डॉ.एफ.एम.बागुल, कार्यालयीन अधीक्षक श्री.संजय निकम, डॉ.ए.ई.माळी, प्रा.एन.एन.बनसोड, डॉ.एस.बी.गिरासे, प्रा.व्ही.बी.चौधरी, डॉ.सी.एम.पावरा आदी उपस्थित होते.

कबचौ उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव च्या एम.कॉम. सीबीसीएस अभ्यासक्रमावर आधारित व्यूहरचनात्मक व्यवस्थापन आणि संशोधन पद्धती या दोन्ही पुस्तकांचे प्रकाशन प्रशांत पब्लिकेशन जळगाव यांनी केले आहे. धनाजी नाना महाविद्यालय फैजपुर येथील डॉ.रवि केसुर यांनी सदर दोन्ही पुस्तकात सहलेखक म्हणून काम केलेला आहे.

डॉ.भक्कड यांच्या आतापर्यंत २६ पुस्तके प्रकाशित झालेली आहेत. त्यांनी राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय नियतकालिके मध्ये एकूण ४२ शोधनिबंध प्रकाशित केले. ते कबचौ उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव च्या अभ्यास मंडळाचे सदस्य आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली ४ विद्यार्थ्यांना पीएचडी पदवी प्राप्त झालेली आहे.  सन २०११ मध्ये थायलंड येथील आंतरराष्ट्रीय परिषदेत त्यांनी सहभाग नोंदवला व यूजीसीच्या अर्थसाहाय्याने सन २०१२ मध्ये मलेशिया येथील आंतरराष्ट्रीय परिषदेत संशोधन कार्य प्रसिद्ध केले. त्याच पद्धतीने कबचौ उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव यांच्या अर्थसाहाय्याने २०१६ मध्ये सिंगापूर येथील आंतरराष्ट्रीय परिषदेत सहभाग नोंदवलेला आहे. त्यांनी यूजीसी पुरस्कृत लघु शोध प्रकल्प पूर्ण केला तसेच आयसीएसएसआर नवी दिल्ली यांच्याकडून त्यांना दीर्घ शोध प्रकल्पासाठी अनुदान सुद्धा मंजूर झालेले आहे.

अशा पद्धतीने त्यांनी अनेक संशोधनात्मक व शैक्षणिक कार्य अल्पकालावधीत पुर्ण केलेली आहे. त्यांच्या या यशाबद्दल केव्हीपी संस्था अध्यक्ष व जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ.तुषार रंधे, कोषाध्यक्ष आशाताई रंधे, सचिव निशांत रंधे, विश्वस्त रोहित रंधे आधी सर्वांनी कौतुक केले आहे.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने