शिरपूर : वाल्मिक नगर येथील २६ वर्षीय तरुणाने काल (दि. १४) दुपारी ३ वाजेच्या सुमारास सावळद्याच्या पुलावरून तापी नदीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. जगदीश शंपा कोळी असे मृत तरुणाचे नाव आहे. आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकले नाही. जगदीशने तापी पात्रात उडी घेतल्याचे समजताच वाल्मीक नगरातील रहिवाशांनी तापी नदीकडे धाव घेतली. मच्छिमारांनी शोधकार्य सुरू केले असता जगदीश कोळी याचा मृत्यू देह अर्धा तासात काढण्यात मच्छीमारांना यश आले. जगदीशला प्राथमिक तपासणीसाठी शिरपूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल केला असता डॉ अमोल जैन यांनी मयत घोषित केले. जगदीश हा एका ट्रान्सपोर्टवर हमालीचे काम करत होता. दहा महिन्यापूर्वीच त्याचे लग्न झाले होते. काही दिवसापूर्वी त्याचा मोठा भाऊदेखील अपघातात मृत्यू झाला आहे. जगदीशच्या निधनाने कोळी परिवारावर दुःखाचा डोंगर पसरला आहे.
Tags
news
